राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांचा शिवसेनेचे ( ठाकरे गट ) उमेदवार संजय जाधव यांनी जालना मतदारसंघात पराभूत केलं होतं. त्यामुळे जानकरांची पुन्हा विधान परिषदेवर वर्णी लागेल, अशी शक्यता वर्तवण्यात येतो होती.
पण, भाजपनं ( bjp ) विधान परिषदेच्या 5 उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली. त्यात जानकर यांच्या नावाचा समावेश नव्हता. विधान परिषदेवर संधी न मिळाल्यानं जानकर नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. तसेच, जानकर विधानसभा निवडणूक लढतील, असं बोललं जात होते.
पण, मी विधानसभेची निवडणूक कधीच लढविणार नाही, असं महादेव जानकर ( Mahadev Jankar ) यांनी सांगितलं आहे. मी अजिबात नाराज नसल्याचं स्पष्टीकरणही जानकर यांनी दिलं आहे. ते विधिमंडळाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
महादेव जानकर म्हणाले, "लोकसभा निवडणुकीत महायुतीनं मला माझ्या वाट्याची एक जागा दिली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला माझी भागिदारी दिली. त्यामुळे मी अजिबात नाराज नाही."
यावेळी तुम्ही विधानसभा निवडणूक लढणार का? असा प्रश्न विचारल्यावर जानकरांनी म्हटलं, "मी कधीही विधानसभा निवडणूक लढणार नाही. मात्र, राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार विधानसभेला उभे राहतील. त्यांना निवडून आणेल."
( Edited By : Akshay Sabale )
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.