Video Mahadev Jankar News : 'बहिणी'ला विधानपरिषद, आता 'भाऊ' राज्यसभेवर जाणार का ? जानकरांचे मोठे संकेत, महायुतीचे टेन्शन वाढले

RSP Leader Mahadev Jankar Big Statement : माझे आणि देवेंद्र फडणवीस यांचे गेल्या 20 वर्षांपासून घरगुती संबंध आहेत.फडणवीस हे माझ्या भावाप्रमाणे आहेत.
Pankaja Munde, Mahadev Jankar
Pankaja Munde, Mahadev JankarSarkarnama

Mumbai News : भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि रासपचे महादेव जानकरांचं बहीण- भावाचं नातं सर्वश्रुत आहे. पंकजा मुंडेंच्या संघर्षाच्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत जानकर यांनी त्यांची बाजूही लावून धरली होती.पण या दोन्हीही नेत्यांना नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. हा पराभव या बहीण भावाच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.

त्यापैकी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना भाजपने विधानपरिषदेची उमेदवारी देत त्यांचं राजकीय पुनर्वसन केले आहे. पण याचवेळी दुसरीकडे त्यांचे 'भाऊ' महादेव जानकरांना भाजपने पुन्हा एकदा विधानपरिषदेची संधी नाकारली आहे.त्यामुळे जानकरांचं पुढं काय होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. यावर खुद्द जानकरांनीच सूचक विधान केले आहे.

विधानपरिषदेची 11 जागांसाठीची निवडणूक येत्या 12 जुलैला होत आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी जी काही दहा नावं फायनल केली होती. त्यात महादेव जानकरांचाही समावेश होता.पण पक्षश्रेष्ठींनी पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत,परिणय फुके,योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांना संधी दिली. त्यामुळे जानकरांचा पत्ता कट झाला. पण तरीही त्यांनी उमेद हारलेली नाही. जानकरांनी पंकजा मुंडेंप्रमाणेच भाजपकडून आपलेही पुनर्वसन केले जाणार असल्याचे संकेत दिले आहे.

परभणी लोकसभा निवडणुकीत पराभव स्विकारावा लागल्यानंतर महादेव जानकरांनी आधी विधानपरिषद आणि नंतर राज्यसभेसाठी महायुतीकडे जॅक लावायला सुरुवात केली आहे.त्यांनी महायुतीकडून आपल्याला विधान परि्षद आणि राज्यसभेची एक- एक जागा देण्याचा शब्द देण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट करत शिंदे-फडणवीस- पवारांचं टेन्शन वाढवलं होतं.

Pankaja Munde, Mahadev Jankar
Narsayya Adam : प्रणितींच्या मतदारसंघात आडम मास्तर लागले विधासभेच्या तयारीला; माकपचे ‘नोट भी दो, वोट भी दो’ अभियान

मुंबईतील 'रासप' कार्यालयाच्या उद्घाटनासाठी महादेव जानकर (Mahadev Jankar) हे मुंबईत आले होते.यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. जानकर यांनी यावेळी विधानपरिषदेची उमेदवारी मिळालेल्या पंकजा मुंडे यांचं अभिनंदन केलं आहे. बहीण पंकजा मुंडेंना विधानपरिषद मिळाली,आता भाऊ महादेव जानकर यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर होणार का अशी विचारणा त्यांना करण्यात आली. त्यावर जानकर यांनी मोठं विधान करत आगामी राजकीय निर्णयाचे संकेत दिले होते.

जानकर म्हणाले, पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी मिळाली. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. बहीण विधानपरिषदेवर आमदार झाल्यानंतर भाऊदेखील राज्यसभेवर नक्कीच जाणार आहे, असे ते म्हणाले आहेत. तसेच काळजी नाही असंही त्यांनी सांगितले.

Pankaja Munde, Mahadev Jankar
Thackeray Vs Shinde : मोठी राजकीय घडामोड! अधिवेशन सुरू असतानाच ठाकरेंच्या 'या' आमदाराचं CM शिंदेंना पत्र, काय आहे कारण..?

जानकर नेमकं काय म्हणाले?

महादेव जानकर म्हणाले, माझे आणि देवेंद्र फडणवीस यांचे गेल्या 20 वर्षांपासून घरगुती संबंध आहेत.फडणवीस हे माझ्या भावाप्रमाणे आहेत.आपण त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होतो हे सांगतानाच त्यांना आपल्या स्वभावाची माहिती असल्याचेही ते म्हणाले.महायुतीच्या एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तीनही प्रमुख नेत्यांनी माझ्या पक्षाला एक जागा लोकसभेला दिली होती.त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. पण जनतेना माझ्याविरोधात कौल दिला आणि त्यात मी पराभूत झालो.हा पराभव आपण मान्य केल्याचेही जानकरांनी सांगितले.

Pankaja Munde, Mahadev Jankar
Mahadev Jankar : लोकसभेत पराभव, विधान परिषदेची संधीही गेली; जानकर विधानसभा लढविणार का?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com