Raver APMC Election Results : रावेर बाजार समितीत 'मविआ'ची आघाडी ; आठ जागा पटकाविल्या..

APMC Election Results Raver : ९ जांगाचे निकाल जाहीर झाले आहेत.
 APMC Election Results Raver
APMC Election Results RaverSarkarnama
Published on
Updated on

Raver APMC Election Results : राज्यातील 95 बाजार समित्यांची आज (29 एप्रिल) मतमोजणी होत आहे. अनेक ठिकाणचे निकाल हाती येत आहेत. काही ठिकाणी आज मतदान होणार आहे. हाती आलेल्या निकालात महाविकास आघाडीने सरशी मारली आहे. तर सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

रावेर बाजार समितीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. प्रारंभीच्या निकालात महाविकास आघाडी आठ तर भाजप शिंदे गट केवळ एका जागेवर विजयी झाले. रावेर बाजार समितीत एकूण अठरा जागा आहेत. त्यापैकी ९ जांगाचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यात महाविकास आघाडीने आठ जागा पटकाविल्या आहेत.

 APMC Election Results Raver
Palghar APMC Election: पालघरमध्ये आघाडीनं झेंडा रोवला ; शिंदे गटाचा सुपडा साफ

हमाल मापारी मतदार संघातून सैय्यद असगर सैय्यद तुकडू, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटकातून पाडुरंग शिवदास पाटील, विकास सोसायटी मतदार संघातून सचिन रमेश पाटील,विकास सोसायटी भटक्या विमुक्त मतदार संघातून जयेश रविंद्र कुयटे विजयी झाले आहेत.

भाजप शिंदे गटाला एक जागा मिळाली असून ग्रामपंचायत अनुसूचित जाती मतदार संघातून सिंकदर तडवी विजयी झाले आहेत. तर इतर चार मतदार संघातही महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत.

 APMC Election Results Raver
Market Committee Election : आमदार फुंडकर यांना मोठा धक्का, बुलडाण्यात आघाडीचा झेंडा

पालघरमध्येही आघाडीचा झेंडा

पालघर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा झेंडा रोवला गेला. 17 पैकी 17 जागा जिंकत महाविकास आघाडीने पालघर कृषी उत्पन्न बाजार समितीवर वर्चस्व प्राप्त केले आहे. पालघर बाजार समितीवर शिवसेना शिंदे गटाचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही.

काल (शुक्रवारी) झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत १५ जागा महाविकास आघाडीच्या बिनविरोध निवडून आल्या होत्या; तर व्यापारी गटाच्या दोन जागांसाठी चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत दोन्ही उमेदवार महाविकास आघाडीचे निवडून आल्याने एकूण सदस्य संख्या १७ झाली. पालघर बाजार समितीवर शिवसेना शिंदे गटाचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com