Eknath Shinde On Fadnavis - Thackeray Meeting : ठाकरे - फडणवीस भेटीवर CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले,'ती लिफ्ट...'

Devendra Fadnavis Meet Uddhav Thackeray : विधिमंडळात जात असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला आहे. या प्रवासात दोघांमध्ये चर्चाही झाल्याचे बोलले जात आहे.
Devendra Fadnavis and Uddhav Thackeray meeting
Devendra Fadnavis and Uddhav Thackeray meetingSarkarnama

Mumbai News : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याच्या राजकारणात सर्वांच्याच भुवया उंचावणारा प्रसंग घडला. 2019 पूर्वी मित्र आणि सध्या कट्टर राजकीय विरोधक असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गुरुवारी (ता.27)भेट झाली.

विधिमंडळात जात असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उद्धव ठाकरे या दोघांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला आहे.या प्रवासात दोघांमध्ये चर्चाही झाल्याचे बोलले जात आहे. आता ठाकरे - फडणवीस यांच्या भेटीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी ठाकरेंना चिमटा काढला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे - फडणवीस यांच्या भेटीवर भाष्य केले. ते म्हणाले, कोणी लिफ्ट मागितली तरी ती सहाव्या मजल्यापर्यंत पोहचू शकणार नाही.आणि 2019 ला त्यांनी लिफ्ट काँग्रेससोबत शिफ्ट केल्यामुळे आम्ही जनतेच्या लिफ्टमध्ये आलो असल्याचे सांगितले.

मी पुणे आयुक्तांना ड्रग्जच्या नशेने तरुणपिढी बर्बाद करणारे अन् ड्रग्ज रिलेटेड काही असु द्या त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात ड्रग्जची विक्री जिथे कुठे होत असेल तिथं कारवाई होणार असून मुळासकट हे ड्रग्ज रॅकेट उखडुन टाकलं जाईल असंही शिंदे यांनी ठणकावून सांगितले.

Devendra Fadnavis and Uddhav Thackeray meeting
VIDEO : Dhananjay Munde News : शेतकऱ्याने बैल नसल्याने भाऊ अन् मुलाला कोळप्याला जुंपले; कृषिमंत्र्यांनी 48 तासांतच पाठवली बैलजोडी!

उद्धव ठाकरे यांच्या शिंदे सरकारचं हे निरोपाचं अधिवेशन आहे, या टीकेलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिले आहेत.निरोप कोण कोणाला देईल हा येणारा काळ ठरवेल.जनता सर्व काही ठरवत असते असं ते म्हणाले. विधानसभेच्या जागावाटपावरुन महायुतीत खटके उडत असल्याच्या प्रश्नांवर त्यांनी महायुती मजबूतीने काम करत आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदेंवर टीकेची झोड उठवतानाच घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली तेव्हाच हे जाहीर केलं होतं की, एकही शेतकरी आत्महत्त्या करणार नाही, पण शेतकरी आत्महत्या करत आहेत. पण घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचं ठीक आहे, कारण त्यांची शेती पंचतारांकित आहे. हेलिकॉप्टरने जाणारे ते एकमेव शेतकरी आहेत. अमावस्या,पौर्णिमेला वेगळं पिक मुख्यमंत्री काढतात असंही कळलं आहे, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला होता.

त्यावर शिंदे म्हणाले, वर्क फ्रॉम होम करुन चालत नाही.फील्डवर उतरून काम करावं लागतं.लंडनमधील पंचतारांकित हॉटेलपेक्षा पंचतारांकित शेती बरी नाही का.त्यांच्या डोक्यात अमावस्या-पोर्णिमा आहे. पण माझ्या शेतातील फळ मी त्यांना पाठवणार असल्याचा चिमटा मुख्यमंत्र्‍यांनी काढला.

Devendra Fadnavis and Uddhav Thackeray meeting
Amol Mitkari Vs Praveen Darekar : 'भाजपच्या काही वाचाळवीरांनी शांत बसावं, अन्यथा...'; मिटकरी अन् दरेकरांमधला वाद टोकाला

'आमच्या पुढील गुप्त बैठका, चर्चा आम्ही लिफ्टमध्ये करू'

उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंच्या भेटीवर थेट भाष्य केले आहे. ते म्हणाले, “आम्ही लिफ्टमध्ये एकत्र होतो. अनेकांना वाटलं असेल, ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे…पण ती योगायोगाने झालेली अनौपचारिक भेट झाली. आमच्यात काही चर्चा नाही. भिंतीला कान असतात,मात्र, लिफ्टच्या भिंतीला कान नसतात. त्यामुळे आमच्या पुढील गुप्त बैठका, चर्चा आम्ही लिफ्टमध्येच करू” अशी मिश्किल टिपण्णीही ठाकरेंनी यावेळी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com