Sushma Andhare : मुख्यमंत्री पदासाठी महायुतीत गडी बादची स्पर्धा; अंधारेंचे राणे पिता-पुत्रावर जोरदार टीकास्त्र

ShivSenaUBT party Sushma Andhare Mahayuti Narayan Rane Sindhudurg : शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महायुतीत मुख्यमंत्री पदावरून सुरू असलेल्या पाडापाडीच्या राजकारणावर बोट ठेवलं.
Sushma Andhare
Sushma AndhareSarkarnama
Published on
Updated on

Sindhudurg News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे सिंधुदुर्ग दौऱ्यावर असतानाच नारायण राणे पिता-पुत्रासह महायुतीवर जोरदार निशाणा साधला.

"राणे भ्रमात आहे. भाजप त्यांचा गेम करत आहेत. गेम करायचा नसता, तर नीलेश यांना एकनाथ शिंदे यांच्या जवळ जायला दिले नसते. हा गेम सुरू असतानाच, मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांचे गडी बाद करत आहेत. नीतेश राणे आणि नीलेश राणे यांचा भाजपला गेम करायचा आहे आणि ते उदय सामंत यांना देखील आवडेल", अशी टोलेबाजी सुषमा अंधारे यांनी केली. अंधारे यांच्या या टीकेमुळे सिंधुदुर्गमधील महायुतीमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

शिवसेना (Shivsena) ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर होत्या. इथं पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महायुतीला चांगलेच डिवचले. यात सर्वाधिक त्यांनी राणे कुटुंबाला डिवचले. अंधारे म्हणाल्या, "नारायण राणेंचे दोन मुलं दोन मतदार संघात आमदारकीला उभी आहेत. तर स्वतः वडील खासदार आहेत. तिसरा मुलगा असता, तर त्याला नारायण राणेनी सावंतवाडीमध्ये उभ केले असते". त्यांना विकासाचा ध्यास आहे, त्यांना असं कोणतं पद मिळालं नाही की, ते विकास करू शकले नाहीत, असा टोला देखील लगावला.

Sushma Andhare
Manoj Tiwari : ठाण्यातील सभेत अभिनेता मनोज तिवारी यांची तुफान फटकेबाजी

'माणूस मुख्यमंत्री असताना विकास करू शकला नाही, तर अजून कोणतं पद पाहिजे होतं. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पद ट्रम्प तात्याऐवजी नारायण राणेना (Narayan Rane) पद दिल पाहिजे होते. कोकणात दहशत आहे, ती दूर करण्यासाठी आम्हाला संधी हवी आहे. ही लढाई धनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशी आहे', असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.

Sushma Andhare
Mahayuti Vs MVA : मागाठाण्यात शिवसेनाविरुद्ध शिवसेना रंगतदारस्थितीत; प्रकाश सुर्वेंची मोठ-मोठाली आश्वासने

'नीलेश राणे जेव्हा तोंड उघडतात, तेव्हा तेव्हा महाविकास आघाडीची मत वाढतात, ते आमचे स्टार प्रचारक होतात. एकनाथ शिंदेनी चित्रपट बनवले, त्यांनी धर्मवीर 3 काढावा आणि नीलेश राणेंची मुक्ताफळ दाखवावीत. बाळासाहेबांना खुनी आरोपी बोलणारे नीलेश राणे हे शिंदेना चालतील का? शिंदे यांनी नीलेश राणेच्या वक्तव्याबाबत प्रचार सभेत बोलवं', असे आव्हान देखील सुषमा अंधारे यांनी दिले. 'राणेंनी कोकण कायम लुटून खाण्याचा प्रयत्न केला. राणेंना पाडण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. फडणवीस यांची ध्वनीफित फिरतेय, त्यावरून ते समजतं, कोकणातील सर्व जागा महाविकास आघाडी जिंकणार, असे म्हणत खुद्दारीविरुद्ध गद्दारी', अशी लढत आहे, असे अंधारे यांनी म्हटले.

'नीतेश राणे भ्रमात आहात असून त्यांनी जागे व्हावं, भाजपला राणेंचा गेम करायचा आहे. जर गेम करायचा नसता, तर एकनाथ शिंदे यांच्याजवळ नीलेश यांना जायला दिले नसते, असा टोला लगावत मुख्यमंत्री पदावरून महायुतीत चाललेल्या कुरघोड्यांवर सुषमा अंधारे यांनी निशाणा साधला.

सुषमा अंधारे म्हणाल्या, मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांचे गडी बाद करत आहेत. नीतेश राणे आणि नीलेश राणे यांचा भाजपला गेम करायचा आहे आणि ते उदय सामंत यांना देखील आवडेल. अशा परिस्थितीत वैभव नाईक कोकण फार चांगलं हॅन्डल करू शकतात, असा विश्वास देखील अंधारे यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com