Mahim assembly Election Results : माहीम मतदारसंघामध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये अमित ठाकरे हे पिछाडीवर आहेत. तिरंगी लढतीत अमित ठाकरे तिसऱ्या स्थानावर असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार महेश सावंत हे आघाडीवर आहेत. तर, सदा सरवणकर हे दुसऱ्या क्रमांकावर आहे.
माहीममध्ये अमित ठाकरे पिछाडीवर असताना काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे तानाजी सावंत, अब्दुल सत्तार हे सुरवातीच्या कलांमध्ये पिछाडीवर आहेत. तर, कुडाळमध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसताना दिसत असून एकनाथ शिंदेंचे उमेदवार निलेश राणे हे 280 मतांनी पुढे आहेत. तर वैभव नाईक पिछाडीवर आहे.
माहीम मतदारसंघातून राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यामुळे ही निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. महायुतीने अमित ठाकरे यांना पाठींबा दिला नसल्याने माहीम मतदारसंघातील निवडणूक तिरंगी होत आहे.
2009 मध्ये नितीन सरदेसाई हे याच मतदारसंघातून मनसेकडून विजयी झाले होते. तर, 2019 च्या निवडणुकीत मनसेकडून संदीप देशपांडे हे लढत होते. ते सदा सरवणकर यांच्याकडून पराभूत झाले मात्र तरीसुद्धा संदीप देशपांडे यांना तब्बल 42 हजार मतं मिळाली होती.
सकाळी साडेदहा पर्यंतच्या कलामध्ये महायुती तब्बल 215 जागांवर आघाडीवर होती. तर महाविकास आघाडीला फक्त 52 जागांवर आघाडीवर होती. दुपारी चार पर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल. मात्र, सुरवातीच्या कलांवरून महायुतीची लाट असल्याचे दिसून येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.