Raju Patil : वाढलेली 65 हजार मतं शिवसेनेलाच कशी पडली? MNS माजी आमदाराने मते मोजण्यासाठी भरले 8 लाख रुपये

MNS leader Raju Patil doubts on EVM : कल्याण ग्रामीण मतदारसंघात एकूण 65 हजार मतदान वाढले आणि 66 हजार मतांनी शिवसेना शिंदे गटाचे राजेश मोरे विजयी झाले आहेत. वाढलेलं सगळंच मतदान त्यांनाच मिळालं का ? असा सवाल राजू पाटील यांनी केला आहे.
MNS leader Raju Patil doubts on EVM
MNS leader Raju Patil doubts on EVMSarkarnama
Published on
Updated on

MNS News: विधानसभा निवडणुकीत महायुतीला तब्बल 230 जागा मिळाल्या आहेत. महायुतीने हे यश EVM मशीन सेट करून मिळवल्याचे आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. सुप्रीम कोर्टाने EVM वरील याचिका फेटाळली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी EVM वर संशय व्यक्त केला आहे.

मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी देखील ईव्हीएम बाबत संशय व्यक्त केला आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघात एकूण 65 हजार मतदान वाढले आणि 66 हजार मतांनी शिवसेना शिंदे गटाचे राजेश मोरे विजयी झाले आहेत.

वाढलेलं सगळंच मतदान त्यांनाच मिळालं का ? असा सवाल मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी केला आहे .एकूणच ही सर्व परिस्थिती संशयास्पद असल्याचा आरोप करत व्हीव्हीपॅट मशीनमधील मते मोजण्यासाठीआठ लाख रुपये भरले आहेत, असे राजू पाटील यांनी सांगितले

राजू पाटील म्हणाले, "यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर अनेक लोक मला भेटतात तुम्हालाच भरभरून मतदान केलं , मात्र ते दिसत नाही असं मतदार सांगतात. या सगळ्या गोष्टी संशयास्पद असल्याने व्हीव्हीपॅट मतमोजणीसाठी आठ लाख रुपये भरले आहेत ,"

MNS leader Raju Patil doubts on EVM
Amol Mitkari: 'जयंतरावांनी बालमित्र मंडळाचा करेक्ट कार्यक्रम केला..'; मिटकरींनी मारले एकाच दगडात दोन पक्षी!

"ईव्हीएम च्या मुद्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी सध्या काय राजकीय घडामोडींना सुरुवात झाली. मुख्यमंत्र्यांना ताप काय आला ,ते दरे गावात जाऊन काय बसले ..शेवटी यांना बीजेपी सांगेल तेच करायचे आहे. मात्र ईव्हीएम वरून लक्ष हटवण्यासाठी हे सर्व सुरू आहे," असे पाटील म्हणाले.

विधानसभेच्या निकालानंतर विरोधी पक्षाकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जात आहे. विरोधी पक्षांकडून ईव्हीएम विरोधात मोहीम देखील छेडण्यात आली आहे . राजू पाटील यांनी देखील ईव्हीएम बाबत संशय व्यक्त केलाय . लोकसभा निवडणुकीत कल्याण ग्रामीण मतदारसंघात 65 हजार मतदान वाढलं .हे वाढलेलं संपूर्ण मतदान विजयी उमेदवाराला कसं काय जाऊ शकतं असा सवाल राजू पाटलांनी केला आहे.

MNS leader Raju Patil doubts on EVM
EVM Controversy : जगभरात EVM वर कोणत्या देशात आहे बंदी; जाणून घ्या!

मनसे नेते अविनाश जाधव यांनी नुकताच राजीनामा दिला आहे, 'महायुतीला मिळालेले यश हे EVM शिवाय शक्यच नव्हते. EVM ने घात केला, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. राज ठाकरे हे आपली भूमिका लवकरच जाहीर करतील, असे देखील जाधव यांनी सांगितले आहे.

"मनसे सैनिकांनी कोव्हिडमध्ये काम केले. गेली पाच वर्ष ते काम करत होते. मात्र जे आमदार लोकांना 10-10 वर्ष भेटले नाहीत ते लाखांच्या फरकाने निवडून आले. हे कसं शक्य आहे. ईव्हीएमशिवाय हे शक्य नव्हते. येवढे मोठे यश मिळूनही भाजपमध्ये आनंद साजरा केला जात नाही," असे अविनाश जाधव म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com