Maharashtra Assembly Live : सत्ताधारी अन् विरोधकांमधील शिवसेनेतच 'सामना'

Maharashtra Assembly Live : आपल्या जुन्या सहकाऱ्यांसोबतच्या संघर्षासाठी शिंदे गटाने आपली हत्यारे तयारी ठेवली आहे.
Maharashtra Assembly Live
Maharashtra Assembly Livesarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेनेला भगदाड पाडून सत्ता काबीज केलेल्या शिंदे गटाने (shinde government) विधीमंडळाच्या अधिवेशनात सरकार म्हणून छाप पाडण्याची जोरदार तयारी ठेवली आहे. (Maharashtra Assembly Live news update)

सभागृहात विरोधी बाकांवरच्या कोणाचीही भीड न ठेवता सरकार म्हणून आक्रमकपणे भूमिका मांडण्याची शिकवण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले मंत्री, आमदारांना दिली पण बंडखोरांना फूस लावून सत्तेतून बाहेर काढलेल्या भाजप नेत्यांची कोंडी करून विरोधी बाणा दाखविण्याची ताकद आणि धमक शिवसेनेचे आमदार दाखविणार का, याकडे लक्ष आहे.

शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू, सत्ताधाऱ्यांना थेट भिडणारे भास्कर जाधव या दोन नावांपलीकडे आजघडीला शिवसेनेला एकही आमदार उरला नसल्याचे दिसत नाहीत. राज्यभर फिरून बंडखोरांविरोधात रान उठवणारे युवा सेनेचे प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे या अधिवेशनात चमकदार कामिगरी करतील आणि बंडखोरांसोबत दोन हात करण्याची शक्यता आहे. मात्र, आदित्य ठाकरेंना सभागृहात ठाण मांडावे लागणार आहे.

अधिवेशनात सत्ताधारी विरोधकांत जोरदार खडाजंगी होते परंतु या अधिवेशनात सत्ताधारी बाकांवर शिंदे गट आणि विरोधकांमधील शिवसेनेतच सामना होणार असल्याचे चित्र आहे. आपल्या जुन्या सहकाऱ्यांसोबतच्या संघर्षासाठी शिंदे गटाने आपली हत्यारे तयारी ठेवली आहे.

त्याकरिता खुद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आघाडीवर आहेत त्या फुटीनंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपासून आदित्य ठाकरेंवर हल्ला करणारे मंत्री गुलाबराव पाटील, उदय सामंत, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, भरत गोगावले, संजय शिरसाट यांच्यसारख्या आक्रमक आणि अभ्यासू नेत्यांची फळी शिंदे यांच्या दिमतीला आहे.

Maharashtra Assembly Live
Ashish Shelar : मोदींचा फोटो दाखवून आदित्य ठाकरे हे निवडून आले ; शेलारांचा टोला

त्या तुलनेत हाताच्या बोटांवर मोजण्यापुरते आमदार उरलेल्या शिवसेनेकडे जाधव, प्रभू वगळता कोणीही नेता शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांना अंगावर घेण्याची शक्यता नाही. त्यात प्रभूही हल्ली कमी बोलतात. शिवसेनेचे गटनेते अजय चौधरीही मोजकेच बोलतात.

त्यामुळे विरोधी बाकांवरच्या अस्तित्त्वात तूर्त तरी आदित्य ठाकरेंना खिंड लढवावी लागणार आहे. विधानसभेपाठोपाठ विधान परिषदेतही तीच गत आहे. विधान परिषदेत शिवसेनेचे चाणक्य मानले जाणारे अनिल परब खिंड लढविण्याची आशा आहे. प्रत्यक्षात मात्र, आपल्यावरील चौकशांच्या कचट्याने 'बॅकफूट'वर गेलेले परबही फारसेही नडण्याची शक्यता धूसर आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com