Jitendra Awhad : सत्ताधाऱ्यांना घाम फोडणारे जितेंद्र आव्हाड 'घामाघूम'

Maharashtra Assembly Monsoon Session Jitendra Awhad : बहुजनांचा मागासलेपणा तसाच रहावा, हीच या सरकारची इच्छा दिसते. आता लगेच म्हणतील की, खोटा नेरेटीव्ह सेट करताहेत. मात्र, त्यांच्या कृतीतून जे वास्तव आहे; तेच दिसून येतंय,अशी टीका आव्हाड यांनी केली.
Jitendra Awhad
Jitendra Awhad sarkarnama

Jitendra Awhad News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची खिंड नेहमीच आक्रमकपणे लढवणारे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आज (सोमवार) विधानसभेच्या आवारात आगळे वेगळे रूप पाहायला मिळाले. आपल्या आक्रमक शैलीने इतरांना घाम फोडणारे आव्हाड स्वतःच घामाघूम झाल्याचे पाहायला मिळाले.

पत्रकारांसाठी उभारण्यात आलेल्या कक्षात जितेंद्र आव्हाड पत्रकरांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत होते. मात्र, फॅन, एसीचा आधार न घेता थेट आव्हाड यांनी पत्रकारांमध्ये बसणं पसंत केलं. त्यामुळे अवघ्या काही वेळातच आव्हाड घामाघूम झाले.

आव्हाड Jitendra Awhad यांनी पत्रकारांसाठी तयार कक्षात पत्रकारांच्या प्रश्नांची सविस्तरपणे उत्तरे दिली. तसेच पत्रकारांशी विविध मुद्यांवर संवाद देखील साधला. मात्र यावेळी तिथे फॅनची कोणती सोय नव्हती. त्यावेळी त्यांना काही लोकांनी तुम्ही फॅन शेजारी बसता का? असे विचार असता त्यांनी नकार देत पत्रकारांच्या शेजारी ठाण मांडले. मात्र यावेळी आव्हाडांना घामाच्या धारा लागल्याचे पाहायला मिळाले.

Jitendra Awhad
Prakash Ambedkar On Raju Shetti : वंचितकडून राजू शेट्टींना ऑफर; विधानसभेला 'मविआ'ला धोक्याची घंटा?

सरकारवर टीका

एससी , एसटी, ओबीसी, मराठा Maratha या सर्व समाजातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी सर्व विद्यार्थी आंदोलने करतात; लाँगमार्च काढतात, निदर्शने करतात. पण, या अर्थसंकल्पात या विद्यार्थ्यांसाठी किंबहुना या बहुजन वर्गासाठी कुठलंय प्रावधान नाही, तसेच त्यांच्यासाठी कोणतीही तरतूद नाही. करोडो रूपये उधळणार्‍या या सरकारला बहुजनांचे शिक्षणच महत्वाचे वाटत नाही. बहुजनांचा मागासलेपणा तसाच रहावा, हीच या सरकारची इच्छा दिसते. आता लगेच म्हणतील की, खोटा नेरेटीव्ह सेट करताहेत. मात्र, त्यांच्या कृतीतून जे वास्तव आहे; तेच दिसून येतंय. त्यालाच ते नेरेटीव्ह म्हणत असतात, असे ट्विट करत आव्हाडांनी सरकारवर टीका केली होती.

(Edited By Roshan More)

Jitendra Awhad
Maharashtra Politics : लाडक्या बहिणीची काळजी कोणाला? ठाकरे गटाने अजित पवारांना डिवचलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com