Harshvardhan Patil : आधी बंडखोरी आता काँग्रेसकडून हर्षवर्धन पाटलांवर घाव; संजय जगतापांनी केली कोंडी

Congress Bhavan Sanjay Jagtap NCP SP : इंदापूर विधानसभा मतदारसंघात हर्षवर्धन पाटील यांना शरद पवारांनी उमेदवारी जाहीर केली आहे.
Harshvardhan Patil, Sanjay Jagtap
Harshvardhan Patil, Sanjay JagtapSarkarnama
Published on
Updated on

Indapur Assembly Election : इंदापूर विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शिक्कामोर्तब केले आहे. पण पक्षांतर्गत बंडखोरी आणि काँग्रेसनेच त्यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी जुन्या वादाला फोडणी देत पाटलांना कोंडीत पकडले आहे.

इंदापूरच्या काँग्रेस भवन वरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस सोडताना काँग्रेस भवनमध्ये आतील बाजुची तोडफोड केली होती. तसेच त्याचा ताबाही सोडला नाही. ही इमारत सध्या काँग्रेसच्या ताब्यात नाही. भवनशी संबंधित कागदपत्रांमध्ये फेरफार करून इंदापूर तालुका काँग्रेस चॅरिटेबल टस्ट असे नमूद करण्यात आल्याचा आरोप जगतापांनी केला आहे.

Harshvardhan Patil, Sanjay Jagtap
Sharad Pawar: शरद पवारांचा पक्ष काँग्रेसचा खेळ बिघडविणार; पुण्यात दोन मतदारसंघात होणार तडजोड?

सिटी सर्व्हे, मिळकत करपत्र तसेच जागेच्या नकाशाबाबतही बनावट कागदपत्रे तयार करण्यात आल्याचा दावा करत जगतापांनी पाटील यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी आधी काँग्रेस भवनची इमारत आणि जागेचा ताबा काँग्रेसकडे द्यावा, अशी मागणी जगतापांनी केली आहे.

पाटील हे काँग्रेस भवनची जागा काँग्रेसच्या ताब्यात देत नाहीत, तोपर्यंत त्यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी संजय जगताप यांनी शरद पवारांकडे केली आहे. त्यामुळे तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते पाटील यांच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे.

Harshvardhan Patil, Sanjay Jagtap
Baba Siddique Murder : 'हे तर गुंडांचे 'शेणापती''; CM शिंदे आणि DCM फडणवीसांची खरडपट्टी

जगतापांच्या आरोपांवर अद्याप हर्षवर्धन पाटील यांच्याकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे ते आता काय भूमिका मांडणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. सध्या राज्यात महाविकास आघाडीमध्ये या दोन पक्षांसह शिवसेनाही आहे. इंदापुरात काँग्रेस भवनवरून आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे आता हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीतील बंडखोरांबरोबरच काँग्रेसच्या आरोपांचाही सामना करावा लागणार आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com