Ravindra Chavan News : मंत्रिमंडळात मोठे फेरबदल, 8 जणांना डच्चू मिळणार का? अखेर रवींद्र चव्हाण यांनीच केलं क्लिअर

Major Cabinet Reshuffle in Maharashtra: What We Know So Far : साम टीव्हीवरील ‘ब्लॅक अँड व्हाईट’ या विशेष कार्यक्रमात रवींद्र चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या घडत असलेल्या विविध घडामोडींवर भाष्य केले आहे.
BJP State President Ravindra Chavan
BJP State President Ravindra Chavan Sarkarnama
Published on
Updated on

Ravindra Chavan Breaks Silence on Reshuffle Rumors : महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील काही दिवसांत उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रामुख्याने काही वादग्रस्त मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. या मंत्र्यांच्या यादीत आठ जणांची नावे आहेत. तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे मंत्री आणि ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार हे अध्यक्ष बनू शकतात, अशीही चर्चा रंगली आहे. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

'साम टीव्ही'वरील ‘ब्लॅक अँड व्हाईट’ या विशेष कार्यक्रमात रवींद्र चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या घडत असलेल्या विविध घडामोडींवर भाष्य केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, ठाकरे बंधूंची युती, वादग्रस्त आमदार, महायुतीतील अंतर्गत वादविवाद अशा विविध विषयांवर त्यांनी मोकळेपणाने संवाद साधला.

मागील काही दिवसांत विविध मंत्रिमंडळातील काही मंत्री वादात अडकले आहेत. त्यांच्या विधानांमुळे वारंवार सरकारला तोंडघशी पडावे लागत आहे. तर काही मंत्र्यांवर विरोधकांनी गंभीर आरोप केले आहे. यापार्श्वभूमीवर आठ मंत्र्यांना डच्चू दिला जाण्याची चर्चा आहे. त्यावर रवींद्र चव्हाण यांनी स्पष्टपणे नाही म्हणत या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. हा केवळ एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.

BJP State President Ravindra Chavan
Jagdeep Dhankhar Update : जगदीप धनखड बेधडकपणे 'हे' बोलले अन् तिथंच घात झाला!

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून सामोरे जाण्याबाबतही त्यांनी सूचक विधान केले आहे. महापालिका असो की नगरपालिका प्रत्येक ठिकाणी महायुतीचीच सत्ता असावी, यासाठी ते आग्रही दिसून आले. तसेच निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर याबाबतचे चित्र स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले आहेत.

BJP State President Ravindra Chavan
Tejashwi Yadav Assassination Attempts : खळबळजनक : निवडणुकीआधी तेजस्वी यादव यांच्या हत्येचा प्लॅन; 4 वेळा झाला हल्ला

सध्याचे वातावरण महायुती सरकारसाठी पोषक नसल्याने निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात, अशीही चर्चा राजकीय वर्तूळात आहे. त्यावर बोलताना चव्हाण यांनी निवडणुकांमध्ये सरकारचा हस्तक्षेप नसतो, असे स्पष्ट केले. सरकारलाही निवडणुका हव्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com