
Mumbai News: राज्यात येत्या दोन-तीन दिवसात महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे. सरकार स्थापन होण्यापूर्वी खातेवाटप, पालकमंत्री पदावरुन तीनही घटक पक्षामध्ये चढाओढ सुरु झाली आहे. एकाच पदावर दोघांनी दावा केल्याने महायुतील घटक पक्षातील धुसफूस चव्हाट्यावर येण्यास सुरवात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.खाते वाटपानंतर पालकमंत्री पदावरुन वाद रंगणार असल्याचे चित्र आहे.
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरु आहे.रायगडच्या पालकमंत्रिपदाची माळ आपल्या गळ्यात पाडावी, यासाठी शिवसेनेचे भरत गोगावले आणि राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे दोन्हीही इच्छुक आहेत. नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीचा दावा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर भाजप आणि शिवसेनेने दावा केला आहे.
भरत गोगावले यांनी मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी शिवलेल्या कोटाची देखील दोन वर्षापासून जोरदार चर्चा सुरु आहे. गोगावले हे दीर्घ काळापासून मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहेत. याबाबत त्यांनी उघडपणे आपली इच्छा बोलूनही दाखवली होती. 'कोट' शिवून तयार असल्याचं त्यांनी अनेकवेळा माध्यमांशी बोलताना सांगितले होते.
शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या गेल्या टर्ममध्ये मंत्रिपदासाठी शपथ घेण्यासाठी शिवलेला कोर्ट आता नव्या सरकारमध्ये परिधान करतील का? याची उत्सुकता रायगडकरांसह अनेकांना आहे. 2009, 2014, 2019 आणि 2024 अशा सलग चार वेळा भरत गोगावले महाड मतदारसंघात शिवसेनेचं आमदार म्हणून प्रतिनिधित्त्व करीत आहेत. 'भरतशेठ'नावाने ते कोकणात प्रसिद्ध आहेत.
शिवसेनेच्या फूटीनंतर स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये रायगडचे पालकमंत्रिपद शिवसेनेच्या उदय सामंत यांच्याकडे होते. रायगडचे पालकमंत्रिपद किंवा अन्य विभागाचे मंत्रिपद आपल्याला मिळावे, यासाठी भरत गोगावले आग्रही होते.
भरत गोगावले यांना एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदी वर्णी लागेल आणि रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळेल अशी आशा होती.महायुती सरकारच्या कार्यकाळाच्या शेवटच्या टप्यात गोगावले यांच्या नशिबी महामंडळ आले. त्यामुळे ते नाराज आहेत.
विधानसभेचा कार्यकाळ संपत आला तरी गोगावले यांना मंत्रिपद मिळालं नव्हतं. अखेर, शेवटच्या टप्प्यात गोगावले यांची महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीच्या अध्यक्षपदी निवड केली आहे.
भरत गोगावले यांना मंत्री पदाचा दर्जा देण्यात आला. पण पालकमंत्री किंवा मोठ्या खात्याचा मंत्री होण्याची गोगावल्याची अभिलाषा लपून राहिलेली नाही. नव्या सरकारमध्ये आता गोगावले मंत्री होतील, अशी आशा त्यांच्या समर्थकांना आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.