Mumbai News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व मंदिर व परिसराची स्वच्छता करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार राज्यातील भाजप नेत्यांकडून स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही मुंबादेवी मंदिर परिसरात स्वच्छता केली. यावेळी ते हटके लुकमध्ये पाहायला मिळाले.
सच्छता मोहिमेत उपमुख्यमंत्री फडणवीसांचा (Devendra Fadnavis) कॅज्युअल लुक दिसून आला. एरवी त्यांचा पेहराव म्हणजे फॉर्मल पॅन्ट, शर्ट आणि त्यावर जॅकेट. उपमुख्यमंत्र्यांचा हा पेहेराव कायम दिसून येतो. मात्र आज साफ सफाई करताना त्यांचा हटके टी- शर्ट लुक दिसून आला. त्यामुळे उपस्थितांचे लक्ष फडणवीसांच्या लुककडे अधिक होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) आणि मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) आदी उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस यांच्या लुकची चर्चा
देवेंद्र फडणवीस हे राजकारणातलं एक दिग्गज नाव आहे. देवेंद्र फडणवीस यांना आदर्श मानणारा, त्यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. आपला नेता काय घालतो, कसा वागतो यावर बरेच जण आपली देखील शैली बदलतात. देवेंद्र फडणवीस यंची देखील कपड्यांची स्टाईल अनेकांना पसंतीची आहे. जेव्हा पासून फडणवीस हे नाव राजकारणात चर्चेला आलं आहे, तेव्हा पासून त्यांची कपड्यांची स्टाईल एकच आहे. फॉर्मल पॅन्ट, शर्ट आणि जॅकेट अशा पेहेरेवात ते नेहमी दिसतात.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नेत्यांकडून साफ सफाई अभियान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशभरातील मंदिरांमध्ये स्वच्छता मोहिम राबवली जात आहे. देशातील भाजपचे सर्वच नेते हातात झाडू घेऊन ठिकठिकाणी साफ सफाई करत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतरही भाजपचे नेतेही यात सहभागी होत आहे. येत्या 22 जानेवारीपर्यंत ही मोहिम सुरू राहणार आहे.
(Edited By - Rajanand More)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.