Lok Sabha Election 2024 : आघाडीत धुसफूस! शिर्डी मतदारसंघात ठाकरेंच्या सेनेचा गेम होणार?

Congress Claims Shirdi Lok Sabha Constituency : शिर्डी लोकसभा मतदारसंघात काँग्रेस शिवसेना ठाकरे गटाला धक्का देणार?
Uddhav Thakrey
Uddhav ThakreySarkarnama
Published on
Updated on

Shirdi Lok Sabha Constituency :

शिर्डी लोकसभा मतदारसंघावरून महाराष्ट्रात महाविकास आघाडीत बिघाडी होण्याचे संकेत मिळत आहेत. महाविकास आघाडीतील काँग्रेसने शिर्डी लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला असल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटात अस्वस्थता पसरली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते तथा सरचिटणीस डॉ. राजू वाघमारे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला अनुकूल वातावरण असून, काँग्रेसनेच ही जागा लढवावी, असा आग्रह धरणार असल्याचे म्हटले आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडे आहे. शिवसेना फुटीनंतर विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे शिवसेना एकनाथ शिंदे गटात गेले आहेत. असे असले, तरी शिवसेना उद्धव ठाकरे गटाने या जागेवर दावा कायम ठेवला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून इच्छुकांची संख्या या मतदारसंघात जास्त आहे.

काहींनी तसा पक्षप्रवेश, प्रचार आणि गाठीभेटींनादेखील सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीमध्ये अजून जागावाटप निश्चित झालेले नाही. यातच एकमेकांकडून या मतदारसंघावर दावा सांगितला जात आहे. शिर्डी मतदारसंघ खेचून घेण्यासाठी काँग्रेसने महाविकास आघाडीत जोरदार ताकद लावली आहे. यातच Congress चे काही नेते या मतदारसंघावर दावा करीत आहेत. यातून पेच निर्माण होत आहेत.

Uddhav Thakrey
Rajendra Phalke News: महायुतीतील सर्व घटकपक्ष विखेंना मान्य आहेत का? फाळकेंनी डागली तोफ

काँग्रेसचे प्रवक्ते तथा सरचिटणीस डॉ. राजू वाघमारे यांनी शिर्डी मतदारसंघासाठी काँग्रेसच योग्य आहे आणि काँग्रेससाठी अनुकूल वातावरण असल्याचे सांगून दावा केला आहे.

राजू वाघमारे म्हणाले, "शिर्डी लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघातील विकासकामाचे श्रेय हे काँग्रेसचे आहे. राज्यात सध्या कार्यरत असलेले खोके सरकार सर्वसामान्य जनतेला मान्य नाही. राज्यातील 48 पैकी 42 जागांवर महाविकास आघाडीला अनुकूल आहेत. यात शिर्डी लोकसभा मतदारसंघाचादेखील समावेश होता. हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने काँग्रेसच्या वाट्याला शिर्डी लोकसभा मतदारसंघ यावा, यासाठी कार्यकर्ता म्हणून आपण प्रयत्न करणार आहोत."

या वेळी डॉ. राजू वाघमारे यांनी भाजपच्या केंद्र आणि राज्यातील ध्येयधोरणावर कडाडून टीका केली. नोटबंदी फेल गेली. शंभर स्मार्ट सिटी, उज्ज्वला गॅस, शौचालय योजना अशा विविध योजना फेल गेल्या आहेत. कधी नव्हे ते इतक्या मोठ्या प्रमाणात देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. प्रभू श्रीराम यांच्या नावाचा वापर भाजप राजकारणासाठी करीत आहे. हिंदू धर्मातील सर्वोच्च धर्मगुरू असलेल्या शंकराचार्य यांच्याबाबत प्रश्न उपस्थित करणारे खरे हिंदू आहेत का? अशी खोचक टीकादेखील डॉ. राजू वाघमारे यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आपण काँग्रेस पक्षाचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहात का? यावर स्मित हास्य करत ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्ष देईल ती जबाबदारी आपण पार पाडू, अशी प्रतिक्रिया डॉ. राजू वाघमारे यांनी दिली. रिपाइंचे (गवई गट) जिल्हाध्यक्ष किशोर वाघमारे, आश्वी बुद्रुकचे सरपंच नामदेव शिंदे, बबन शिंदे उपस्थित होते.

edited by sachin fulpagare

R...

Uddhav Thakrey
Sangram Jagtap : आंबेडकर स्मारक सुशोभीकरण ब्लॅकमेलरांमुळे रखडले; आमदाराचा सनसनाटी आरोप

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com