Uddhav Thackeray PC : ठाकरेंची महापत्रकार परिषद; 'नार्वेकरांच्या निकालाची 'चिरफाड' करणार...'

Uddhav Thackeray On Shiv Sena MLA Disqualification : कायद्यानेच उत्तर देणार, राहुल नार्वेकरांची कोंडी करणार?
Uddhav Thackeray PC
Uddhav Thackeray PC Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी १६ आमदार अपात्रतेप्रकरणी घेतलेल्या दिलेल्या निकालाबाबत पत्रकार परिषद घेऊन चिरफाड करणार, असा दावा ठाकरे गटाकडून केला गेला आहे. आजची ही महापत्रकार परिषद असल्याचीही बोलले जात आहे. नार्वेकरांनी दिल्लीची स्क्रिप्ट वाचत, लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप ठाकरेंकडून केला गेला. आता याबाबत कायदेपंडित-विधिज्ञांची यावर खुली चर्चा व्हावी, यासाठी आजच्या या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)

Uddhav Thackeray PC
Rahul Narwekar : ठाकरे गटाने केलेल्या आरोपांचा नार्वेकरांनी एका वाक्यातच निकाल लावला; म्हणाले...

विधानसभेच्या अध्यक्ष यांनी आमदार अपात्रता प्रकरणी आपला निकाल दिल्यानंतर ठाकरेंचे शिलेदार आक्रमक झाले असून, कायद्यावर बोट ठेवून याला उत्तर ते देणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि चौकट या प्रकरणात दिले असताना, या सर्व बाबींना झुगारुन अध्यक्षांनी मनमानी निर्णय घेतला आहे, असा आरोप ठाकरे गटाचा आहे. त्यामुळे कायद्याच्या चौकटीतच अध्यक्ष नार्वेकर यांना लक्ष्य करण्यासाठी या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

उद्धव ठाकरेंची ही महापत्रकार परिषद ऐतिहासिक असणार असल्याबाबत बोलले जात आहे . राहुल नार्वेकरांनी कायद्याची तमा न बाळगता, मनमानी कारभार केल्याचे, ते कायद्याच्या तरतूदींवर बोट ठेवून सांगणार आहेत. निकालाची चिरफाड करणार असल्याचा दावा ठाकरे गटाने याआधीच केला आहे. आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास होणाऱ्या या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे नेमके कोणते मुद्दे मांडणार आणि जनतेसमोर नवीन काय मुद्दे आणणार? याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे.

Uddhav Thackeray PC
Sena MLA Disqualification Result : शिवसेना आमदार अपात्रता निकालावर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

दोन्ही गटाच्या न्यायालयात याचिका -

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 10 जानेवारी रोजी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी मोठा निकाल दिला. या निकालाचे पडसाद देशभर उमटले. यावर उलट-सुलट प्रतिक्रीया विरोधकांकडून आले. आता या निकालाविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल गेली आहे. तर सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेनेही नार्वेकरांच्या निकालाविरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी त्यांच्या निकालात शिवसेना एकनाथ शिंदेंचीच (Eknath Shinde) असे स्पष्ट केले होते. शिवाय त्यांनी शिंदे आणि ठाकरे असे दोन्ही गटांचे आमदार अपात्र ठरवले नव्हते. पण हा निकाल म्हणजे सुप्रीम कोर्टात अवमान असल्याचा दावा करत ठाकरेंच्या शिवसेनेने सु्प्रीम कोर्टात धाव घेतली आहे. तर ठाकरेंच्या आमदारांना अपात्र न ठरल्याने शिंदेंच्या शिवसेनेने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com