Maharashtra Politics : निवडणूक आयोगाच्या भेटीवरून भाजप प्रवक्त्याने शरद पवारांसह ठाकरेंना डिवचताच अंबादास दानवे मैदानात; म्हणाले, 'तुमच्या बॉसला 11 वर्षात...'

MVA Delegation Meets Election Commission : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शी पद्धतीने व्हाव्या तसंच महाराष्ट्रातील मतदार याद्यांमधील घोळ दूर करावा अशा विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडी, मनसे आणि राज्यातील इतर विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने काल (ता.14) राज्य निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेतली.
Ambadas Danve
Ambadas DanveSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 15 Oct : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शी पद्धतीने व्हाव्या तसंच महाराष्ट्रातील मतदार याद्यांमधील घोळ दूर करावा अशा विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडी, मनसे आणि राज्यातील इतर विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने काल (ता.14) राज्य निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिलं.

मात्र यावेळी समाधानकारक उत्तरं न मिळाल्याने आज पुन्हा हे शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे आणि राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी एस चोकलिंगम यांची भेट घेणार आहे.

मात्र, विरोधकांच्या शिष्टमंडळाने केलेल्या मागण्यांवरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टीका केली आहे. त्यांनी एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये विरोधकांना उद्देशून लिहिलं की, 'आपण नेमकं कशासाठी जातोय? त्यासाठी नेमकं कुणाकडे जायला हवं, याचं साधं आकलन नाही. विषय समजून घेण्याची कुवत नाही. कोणता विषय कोणाकडे न्यावा याचे भान नाही. कायदेशीर बाबींचे ज्ञान नाही.

Ambadas Danve
Nashik Crime : RPI नेते प्रकाश लोंढेच्या गँगला नाशिकमध्ये निर्माण करायची होती संघटीत गुन्हेगारी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

‘झगामगा मला बघा’ यापलीकडे पोच नाही आणि म्हणूनच जनतेचा विश्वास नाही. बहुसदस्यीय प्रभाग रद्द करा, मतपत्रिकेवर मतदान घ्या आणि मतदारयाद्यांमध्ये बदल करा, अशा राज्य निवडणूक आयोगाला, निवडणूक अधिकाऱ्यांना अधिकारच नसलेल्या मागण्या करून शरद पवार, उध्दव ठाकरे, बाळासाहेब थोरात, राज ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे गोंधळ घातला त्याचे वर्णन नेमके याच शब्दात करावे लागते.

राज ठाकरे यांचं ठीक आहे. उद्धव ठाकरेंना तर प्रशासन कशाशी खातात तेही माहीत नाही, पण शरद पवार, बाळासाहेब थोरांतासारखे ज्येष्ठ व प्रशासनाची माहिती असलेली अनुभवी नेतेमंडळी अशा शिष्टमंडळात फरफटत जातात, ही राजकीय अपरिहार्यता की अपयशामुळे येणारी अगतिकता? अशी टीका उपाध्ये यांनी केली.

Ambadas Danve
Maharashtra Politics : उद्धव-राज ठाकरे निवडणूक आयोगाला पुन्हा भेटणार, शरद पवार मात्र गैरहजर राहणार! खरं कारण आलं समोर

तर त्यांच्या या टीकेला आता ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. दानवेंनी एक्सवर लिहिलं की, 'विरोधकांनी तुमची निवडणुकांतील शस्त्र जनतेपुढे उघड केली याचा जळफळाट व्यक्त कारण्यासाठी एवढा मोठा निबंध? वा, आपली आग क्षमवण्यास एवढं लिहायची गरज ती काय? थोडं बरनॉल वापरलं असतं तरी झालं असतं.

प्रश्न आमचे आहेत, उत्तरे कुठून घ्यायची हे पण आम्ही पाहू. पण अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री हिंदुस्थानात येऊन आठवड्यात दोन-दोन पत्रकार परिषद घेतात. भाजपच्या बॉसला 11 वर्षात एकही प्रेस घेता अली नाही! का? प्रवक्ते म्हणून याचे उत्तर द्या,' असा हल्लाबोल दानवे यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com