Aditya Thackeray : 'फक्त आश्वासन...'; CM फडणवीस अन् पंतप्रधान मोदींच्या भेटीवरून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

Aditya Thackeray on Maharashtra Farmers Relief : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं दुर्दैव की सध्या महाराष्ट्रात निवडणुका नाहीत. नाहीतर केंद्रआणि राज्यातील भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठं पॅकेज जाहीर केलं असतं आणि मदतीपेक्षा मोठ्या जाहिराती करण्यासाठी धडपड केली असती.
Aditya Thackeray On Devendra Fadnavis And PM Modi Meeting
Aditya Thackeray On Devendra Fadnavis And PM Modi MeetingSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 30 Sep : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं दुर्दैव की सध्या महाराष्ट्रात निवडणुका नाहीत. नाहीतर केंद्रआणि राज्यातील भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठं पॅकेज जाहीर केलं असतं आणि मदतीपेक्षा मोठ्या जाहिराती करण्यासाठी धडपड केली असती.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊनही महाराष्ट्रासाठी कोणतीही ठोस मदत जाहीर झाली नाही. मागील दोन-अडीच वर्षात जवळपास शेतकऱ्यांच्या मदतीची 15 हजार कोटींची थकबाकी आहे, असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी फडणवीस आणि मोदी भेटीवरून हल्लाबोल केला आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, 'अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी मेटाकुटीस आहे मात्र, राज्य सरकारपर्यंत शेतकऱ्यांचा आवाज पोहोचत नाहीये. इतके सरकारने दुर्लक्ष केलं आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार नुकसानभरपाई आणि कर्जमाफीची गरज आहे. आज महाराष्ट्रात निवडणुका असत्या तर पैशांचा महापूर आला असता, पण दुर्दैवाने आज महाराष्ट्रात निवडणुका नाहीत. हे सरकार आपल्याच मस्तीत पुढे जात आहे.

Aditya Thackeray On Devendra Fadnavis And PM Modi Meeting
MIM News: कोल्हापुरात 'एमआयएम' पक्ष कार्यालयाचा वाद पेटला; ओवैसी अन् इम्तियाज जलील यांना हॉटेलबाहेर पडणंही झालं मुश्किल

बिहारमध्ये लवकरच विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे मोदी सरकारने तेथील महिलांना प्रत्येकी 10 हजार दिले आहेत. ते दिल्याची पोटदुखी आम्हाला नाही. पण आम्ही तुम्हाला सर्वात जास्त जीएसटी देतो. महाराष्ट्रातून देशाला जाणारा महसूल सर्वात जास्त असतानाही आज मदत काही जाहीर झाली आहे का? आम्ही आमच्या हक्काची मदत मागत आहे.'

Aditya Thackeray On Devendra Fadnavis And PM Modi Meeting
Eknath Shinde Politics : एकनाथ शिंदेंचा शरद पवारांना मोठा झटका, जिल्हाध्यक्षच फोडला, भाजपलाही इशारा!

दरम्यान, यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली तरीही त्यांना केवळ आश्वासन मिळालं. कोणतीही ठोस मदत जाहीर झाली नसल्याचंही म्हटलं आहे. शिवाय मागील दोन-अडीच वर्षापासून शेतकऱ्यांच्या मदतीच्या सुमारे 15 हजार कोटींची थकबाकी असून हे पैसे कुणाचे आहेत?

दुसऱ्या राज्यात निवडणुका आल्यामुळे या पैशांची उधळपट्टी केली जात आहे. बिहारमध्ये अनेक वर्षांपासून भाजपची सत्ता असूनही त्यांना मते विकत घ्यावी लागत आहेत, असा हल्लाबोल ठाकरेंनी भाजपवर केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com