Maharashtra Government: शिंदे-फडणवीस-पवार सरकार करणार इंजिनियर, मॅनेजर 'हायजॅक'

Maharashtra Government May Participate in Recruitment Process : गेल्या सहा ते सात वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने शिपाई, सफाई कामगार अशा किरकोळ स्वरूपाची पदे ही कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत होती.
Maharashtra Government
Maharashtra GovernmentSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे यांनी वातावरण तापवले असतानाच शिंदे-फडणवीस-पवार सरकारने सर्व महत्त्वाचे पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. ही पदे भरण्याचे कंत्राट नऊ कंपन्यांना मिळणार असल्याची माहिती आहे.

आतापर्यंत सरकारी कार्यालयांमध्ये विविध पदे हे परीक्षांच्या माध्यमातून भरली जात होती. आता खासगी कंपन्याकडून ही पदे भरली जाणार आहेत. प्रशासनातील महत्वाची पदे 'हायजॅक' करण्याचा शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा डाव आहे का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

नऊ खाजगी कंपन्यांकडून अतिकुशल मनुष्यबळ या संवर्गात कनिष्ठ अभियंता, प्रोजेक्ट मॅनेजर, मॅनेजर, आयटी अधिकारी, वरिष्ठ अभियंता, माहिती अधिकारी अशी वेगवगेळ्या 70 प्रकारची हजारो पदे भरण्यात येणार आहेत. या पदांवरील व्यक्तींना महिना दीड लाख ते ऐंशी हजारांपर्यंत पगार देण्यात येणार असल्याचे समजते.

कुशल मनुष्यबळ या संवर्गात कायदा अधिकारी, शिक्षक सहाय्य्क अधिकारी, लेखाधिकारी, सहाय्य्क संशोधक यासारख्या पन्नास प्रकारची हजारो पदे भरण्यात येणार आहेत. पदांवरील व्यक्तींना महिन्याला १५ हजारांपासून ते ४५ हजारांपर्यंत पगार दिला जाणार आहे.

अर्धकुशल आणि अकुशल संवर्गातील हाऊसकीपिंग, मदतनीस , मजूर यासारखी हजारो पदे देखील खाजगी कंपन्यांकडून भरली जाणार आहेत. आतापर्यंत सरकारी कार्यालयांमध्ये विविध पदे ही परीक्षांच्या माध्यमातून भरली जात होती.

गेल्या सहा ते सात वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने शिपाई, सफाई कामगार अशा किरकोळ स्वरूपाची पदे ही कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत होती. परंतु याही पुढे जात आता सरकारने या किरकोळ पदांव्यतिरिक्त अतिकुशल ते कुशल व अर्ध कुशल आणि अकुशल कर्मचाऱ्यांची भरती आता कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे. त्याला अनेकांचा विरोध आहे. ही पदे भरण्याचा अधिकार नऊ कंपन्यांना देण्यात येणार आहे.

Maharashtra Government
Vinod Tawde: विनोद तावडे यांनी नेत्यांना फटकारले; मुद्द्यावर बोला!

नऊ कंपन्या कंपन्यांना मिळणार कंत्राट

  • क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रा. लि. – मुंबईत दादरमध्ये शिवसेना भवनसमोर मुख्य कार्यालय आहे.

  • एस-२ इन्फोटेक इंटरनॅशनल लि. – मुंबईत नरीमन पॉईंट येथे कार्यालय आहे.

  • सैनिक इंटेलिजन्स सिक्युरिटी प्रा. लि. – मुंबईत भायंदर येथे कार्यालय आहे.

  • सिंग इंटेलिजन्स सिक्युरिटी प्रा. लि. – मुंबईत अंधेरी येथे कार्यालय आहे.

  • उर्मिला इंटरनॅशनल सर्व्हिसेस प्रा. लि. – कंपनीचे मुख्यालय बिहारमधील पटना येथे आहे. तसेच दिल्ली, नागपूर, बेंगलुरू, भोपाळमध्येही कार्यालये आहेत.

  • ॲक्सेंट टेक सर्व्हिसेस लिमिटेड – मुंबईत नरीमन पॉईंट येथे कार्यालय असून ही कंपनी आयटी बिझनेसमध्ये आहे. विविध क्षेत्रात आयटीशी संबंधित कामांमध्ये कंपनी सक्रीय आहे.

  • सी.एम.एस. आयटी सर्व्हिसेस प्रा. लि. – बेंगलुरू येथे कार्यालय आहे.

  • सी.एस.सी. ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लि. – केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयामार्फत संचलित सेवा पुरवठा संस्था आहे. या माध्यमातून विविधे सेवा पुरवल्या जातात.

  • इनोवेव आयटी इन्फ्रास्ट्रक्चर लि. – विविध आयटी सेवा पुरवठादार कंपनी असून मुंबईत मुख्यालय आहे. तसेच दिल्ली, पुणे आणि नागपुरातही कार्यालये आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com