Maharashtra Government : निवडणूक आयोगाच्या सचिवांबाबत फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; तारखा जाहीर होण्याच्या काही तास आधीच काढला GR

Maharashtra Government Extends Tenure of Election Commission Secretary : सरकारकडून राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांच्या नियुक्तीस 10 डिसेंबर 2025 पासून पुढे एक वर्षांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
“Maharashtra Government announces one-year extension for the State Election Commission Secretary, effective December 10, 2025.”
“Maharashtra Government announces one-year extension for the State Election Commission Secretary, effective December 10, 2025.”Sarkarnama
Published on
Updated on

Administrative Changes within Maharashtra Election Commission : राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेपूर्वीच राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. आयोगाचे सचिव असलेले निवृत्त IAS सुरेश काकाणी यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. सरकारकडून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. विरोधी पक्षांनी राज्यातील मतदारयाद्यांमधील त्रुटींवरून आयोगाला धारेवर धरलेले असतानाच राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवपदी काकाणी यांची 10 नोव्हेंबर 2023 रोजी एक वर्षाच्या कालावधीसाठी करार पध्दतीने नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने 10 डिसेंबर 2024 रोजी पुढील सहा महिन्यांसाठी किंवा पुढील आदेश होईपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

2024 मध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संभावित असल्याने सामान्य प्रशासन विभागाने 16 डिसेंबर 2024 च्या शासन निर्णयान्वये काकाणी यांना पुन्हा एक वर्षांसाठी मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार काकाणी यांची मुदत डिसेंबर महिन्यात संपणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या 6 मे व 16 सप्टेंबरच्या निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घ्याव्या लागणार आहेत.

“Maharashtra Government announces one-year extension for the State Election Commission Secretary, effective December 10, 2025.”
Shashi Tharoor News : शशी थरूर यांच्यामुळे राजकारणात वादळ; भाजप नेता म्हणाला, माझ्यासोबत काय झाले, हे तुम्हाला माहित...

आज जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार, सध्या आयोगाच्या कार्यालयात निवडणुकीचे कामकाज युध्द पातळीवर सुरू असल्याने सुरेश काकाणी यांच्या सेवा आयोगास अत्यावश्यक असल्याने आयोगाने काकाणी यांच्या सचिव पदावरील नियुक्तीस एक वर्षांसाठी मुदतवाढ देण्याची विनंती केली होती.

“Maharashtra Government announces one-year extension for the State Election Commission Secretary, effective December 10, 2025.”
Tukaram Mundhe News : तुकाराम मुंढेंचा आयुक्तांच्या अधिकारांबाबत धडाकेबाज निर्णय; ‘हे’ पाऊल मोठा बदल घडविणार... 

आयोगाची मुदतवाढीची विनंती राज्य सरकारने मान्य केली आहे. त्यानुसार सरकारकडून काकाणी यांच्या नियुक्तीस 10 डिसेंबर 2025 पासून पुढे एक वर्षांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, हा जीआर जारी झाल्यानंतर काही वेळातच राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे व सचिव काकाणी यांनी एकत्रितपणे पत्रकार परिषद घेत राज्यातील नगरपंचायती व नगरपरिषद निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. त्यानुसार 2 डिसेंबर रोजी मतदान व तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com