Shivsena News : फडणवीस, अजितदादांच्या पक्षाप्रमाणेच आता शिंदेंचे मंत्रीही 'कॉमन मॅन'साठी मैदानात

Political News : राज्यात नवे सरकार आल्यानंतर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याने राज्यातील गोरगरीब जनतेच्या, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जनता दरबारात मंत्री थेट जनतेच्या भेटीला येत होते.
Ekanath Shinde Shiv sena
Ekanath Shinde Shiv senaSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महायुतीचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला आहे. त्यामुळे आगामी काळात हॊत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. राज्यात नवे सरकार आल्यानंतर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याने राज्यातील गोरगरीब जनतेच्या, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जनता दरबारात मंत्री थेट जनतेच्या भेटीला येत होते.

आता येत्या काळात त्याचप्रमाणे शिंदेंच्या शिवसेनेचे (Shivsena) मंत्री देखील थेट जनतेच्या भेटीला येणार आहेत. शिवसेना पक्ष मध्यवर्ती कार्यालय, बाळासाहेब भवन येथे दर आठवड्याला सोमवार ते बुधवार असे तीन दिवस तीन सत्रांमध्ये शिवसेना मंत्री जनतेच्या भेटीसाठी उपलब्ध असणार आहेत.

Ekanath Shinde Shiv sena
Mahayuti News : 'स्थानिक'च्या निवडणुकीवरून धुसफूस; अशोक चव्हाणांच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर महायुतीत रणकंदन

आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन तयारी सुरु करण्यात आली आहे. त्यातच आता शिवसेनेने मतदारांना आकर्षित करण्यासाठी एक नवीन युक्ती शोधली आहे. राज्यातील गोरगरीब जनतेच्या, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून त्यांचे निराकरण करण्यासाठी शिवसेनेचे मंत्री थेट जनतेच्या भेटीला येणार आहेत.

हे सर्व मंत्री दर आठवड्याला सोमवार ते बुधवार असे तीन दिवस तीन सत्रांमध्ये शिवसेना पक्ष मध्यवर्ती कार्यालय, बाळासाहेब भवन येथे जनतेच्या भेटीसाठी उपलब्ध असणार आहेत. यासाठी नागरिकांना बाळासाहेब भवन येथे अर्ज उपलब्ध केले आहेत. तसेच गुगल फॉर्मच्या माध्यमातून देखील ऑनलाईन अर्ज सादर करावेत, त्यानुसार मंत्र्यांच्या भेटीची वेळ दिली जाईल, असे शिवसेनेने निवेदनाद्वारे म्हटले आहे.

Ekanath Shinde Shiv sena
BJP Politics : रोहित पाटलांसह कदमांच्या मतदारसंघात भाजपला बळ? जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात ही मुसंडी

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या सूचनेनुसार बाळासाहेब भवनात शिवसेना मंत्री जनतेची गाऱ्हाणी ऐकून घेणार आहेत. याचबरोबर पक्ष कार्यकर्त्यांनाही या तीन दिवसांत थेट मंत्र्यांना भेटता येणार आहे. राज्यातील गोरगरिब जनतेचे गाव, तालुका पातळीवरील तसेच मंत्रालय संबंधित अडचणी आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी शिवसेनेचे ११ मंत्री आठड्यातील तीन दिवस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असतील.

बाळासाहेब भवनमध्ये सोमवारी सकाळी 9 ते 11 या वेळेत राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत सर्वसामान्य लोकांना भेटतील. त्यानंतर सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे जनतेची गाऱ्हाणी ऐकतील. सायंकाळी 4 ते 7 या वेळेत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे सर्वसामान्यांच्या अडचणी जाणून घेतील.

Ekanath Shinde Shiv sena
Ajit Pawar On Budget : राज्याच्या अर्थमंत्र्यांनाच अर्थसंकल्प ऐकता आला नाही, अजितदादांची जाहीर कबुली; म्हणाले,पण...

मंगळवारी सकाळी 9 ते 11 या गृहराज्य मंत्री, महसूल राज्यमंत्री, पंचायत राज, अन्ननागरी पुरवठा आणि औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम हे सर्वसामान्यांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत वित्त, नियोजन, कृषी मदत व पुनर्वसन, विधी न्याय आणि कामगार राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची भेट घेता येईल. त्याच दिवशी सायंकाळी 4 ते 7 यावेळेत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे मंत्री जनतेच्या समस्या जाणून घेतील.bjp

Ekanath Shinde Shiv sena
BJP News : लातूर भाजपमध्ये जुना-नव्याचा वाद पेटला; विधान परिषदेच्या रिक्त जागेसाठी फिल्डिंग

बुधवारी सकाळी 9 ते 11 या वेळेत पर्यटन, खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांना भेटता येणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांना भेटता येईल. त्यानंतर सायंकाळी 4 ते 7 या वेळेत पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आणि रोजगार हमी योजना, फलोत्पादन खार भूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले हे दोन मंत्र्‍यांना भेटतील, असे शिवसेना सचिव संजय मोरे यांनी निवेदनाद्वारे म्हटले आहे.

येत्या काळात मंत्री महोदयांना कामानिमित्त भेटीसाठी य़ेणाऱ्या नागरिकांसाठी पक्ष कार्यालयात अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या अर्जातील माहिती सविस्तर भरुन आणि कामाच्या विषयाचा उल्लेख करुन मंत्र्यांची भेट घ्यावी, असे आवाहन पक्ष सचिव संजय मोरे यांनी केले आहे.

Ekanath Shinde Shiv sena
Shiv Sena Operation Tiger : शिवसेनेचे 'ऑपरेशन टायगर'; एकनाथ शिंदेंची पुण्यासाठी वेगळी रणनीती

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com