Pune Congress: विधानसभा उमेदवारीसाठी काँग्रेसचा नवा फाॅर्म्युला; नव्या चेहऱ्यांना संधी?

Vidhan Sabha election Pune Congress New formula: पुणे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाला असला तरी काही पॉझिटिव्ह गोष्टी समोर आल्या आहेत.
Pune Congress
Pune CongressSarkarnama
Published on
Updated on

Pune News: लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात काँग्रेसला घवघवीत यश मिळालं. महाराष्ट्रात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला. लोकसभा उमेदवारी देताना काँग्रेसकडून यावेळी विशेष काळजी घेण्यात आली होती. जुन्या-नव्यांचा समतोल साधत उमेदवार निश्चित करण्यात आले होते. नव्या दमाच्या उमेदवारांना दिलेली संधी काँग्रेससाठी फायदेशीर ठरली.

विधानसभा निवडणुकीसाठी देखील काँग्रेस नवा फाॅर्म्युला घेऊन मैदानात उतरणार असल्याचं बोललं जात आहे. पुण्यातील काँग्रेसच्या (Pune Vidhan Sabha election) बैठकीत देखील याच फॉर्मुल्याची चर्चा झाल्याचं सांगण्यात येते. त्यामुळे पुण्यातील इच्छुकांचा उत्साह वाढल्याचे बोललं जाते.

पुणे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस (Pune Congress) उमेदवाराचा पराभव झाला असला तरी काही पॉझिटिव्ह गोष्टी काँग्रेससाठी समोर आल्या आहेत. गेल्या निवडणुकीतील भाजपचे तीन लाखाहून अधिकच असलेलं मताधिक्य यावेळी दीड लाखावर आले आहे.

Pune Congress
Radheshyam Mopalwar: CM का बहुत याराना लगता है! 5 मुख्यमंत्री, 7 वेळा मुदतवाढ; मोपलवारांवर सत्ताधाऱ्यांची मेहेरनजर

पुणे कॅन्टोन्मेट विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस आघाडीवर राहिला आहे. तर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघांमध्ये देखील काँग्रेसने चांगली लढत दिली आहे. त्यामुळे थोडीफार ताकद लावल्यास या दोन जागा निश्चित आपण जिंकू असा विश्वास काँग्रेसला वाटतो.

कसबा विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचा आमदार असून पर्वती आणि हडपसर विधानसभा मतदारसंघ ही महाविकास आघाडीमध्ये आपल्या वाट्याला यावा, अशी मागणी स्थानिक काँग्रेस नेत्यांनी त्यांनी वरिष्ठांकडे केली आहे.

काँग्रेसने पुण्यातील आठपैकी पाच विधानसभा मतदारसंघावर आपला दावा सांगितला असला तरी आठ ही विधानसभा मतदारसंघांमध्ये इच्छुक असलेल्यांचे अर्ज मागवले आहेत. पाच ऑगस्टपर्यंत हे अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर हे अर्ज वरिष्ठांकडे सोपवून त्यामधून उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com