Maratha Reservation : आरक्षणाच्या मुद्द्यावर फडणवीसांनी पत्रकार परिषद घ्यावी; यासाठी भुजबळ, मनोज जरांगे अन् एकनाथ शिंदेंनाही बोलवावं, राऊत नेमकं काय म्हणाले?

Maratha Reservation and OBC Quota Clash : राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं आहे. एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, त्यांच्यावर अन्याय होणार नाही, असं सांगत आहेत.
Eknath shinde, , manoj jarange patil, chhagan Bhujbal, devendra fadnavis
Eknath shinde, , manoj jarange patil, chhagan Bhujbal, devendra fadnavis
Published on
Updated on

Mumbai News, 13 Sep : राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं आहे. एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, त्यांच्यावर अन्याय होणार नाही, असं सांगत आहेत.

तर दुसरीकडे सरकारमधीलच मंत्री छगन भुजबळ हे ओबीसींवर अन्याय झाल्यांचं म्हणत आहेत. त्यामुळे राज्यात सध्या सरकारमध्येच एकमत नसल्याचं पाहायला मिळत आहेत. त्यामुळे मराठा आणि ओबीसी समाजामध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. अशातच आता याच मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे.

आरक्षणाबाबत सरकारमधील मंत्र्यांमध्ये असलेले मतभेदावरून पत्रकारांनी प्रश्न विचरला असता राऊत म्हणाले, "देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत. राज्यातले सगळे राज्यातंर्गत आणि कॅबिनेट प्रश्न सोडवायला ते समर्थ आहेत. उद्या मंत्र्यांचे खून पडले तरी मला आश्चर्य वाटणार नाही. एकदिवस कॅबिनेटमध्ये गँगवार होईल, असं म्हटलं म्हणून मला माओवादी ठरवतायत.

Eknath shinde, , manoj jarange patil, chhagan Bhujbal, devendra fadnavis
Mahayuti Politics : CM फडणवीसांनी सर्वच महापालिकांबाबत घेतलेल्या 'त्या' मोठ्या निर्णयामुळे एकनाथ शिंदे नाराज?

पण कॅबिनेटमध्ये, सरकारमध्ये टोकाचा संघर्ष सुरू आहे. छगन भुजबळ म्हणतात महाराष्ट्रात अराजक होईल असं म्हणतात मग जनसुरक्षा कायद्याखाली भुजबळांवर कारवाई करणार का?" असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. तर आरक्षणाच्या विषयावर लोक आत्महत्या करत आहेत. लातूरमध्ये आत्महत्या झाली.

Eknath shinde, , manoj jarange patil, chhagan Bhujbal, devendra fadnavis
Laxman Hake : आता तुम्ही ओबीसीत आला पहिले 11 विवाह आपापसात ठरवुया! भरस्टेजवरून लक्ष्मन हाकेंनी जरांगेंना प्रस्ताव देत डिवचलं, म्हणाले, "पाटील, 96 कुळी..."

त्यामुळे या विषयावर बोलण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समोर येऊन एक जाहीर पत्रकार परिषद घेतली पाहिजे. ही पत्रकार परिषद त्यांनी मराठवाड्यातच घ्यावी किंवा अंतरवाली सराटीमध्ये घ्यावी आणि लोकांच्या प्रश्नांना ठोक उत्तर द्यावी त्यांच्या मनात ज्या शंका आहेत त्यांना उत्तरं द्यावी. मग त्या पत्रकार परिषदेला मंत्री छगन भुजबळ, अजित पवारांना, एकनाथ शिंदेंना आणि मनोज जरांगे पाटलांना बोलवा शिवाय ओबीसी नेत्यांना बोलवा आणि तो विषय तिकडेच संपवा, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com