
Maharashtra Minister Honey Trap: राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु असतानाच गेल्या तीन ते चार दिवसांपासून काही मंत्री हनीट्रॅपमध्ये अडकले असल्याची चर्चा सुरु आहे. काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी सभागृहात एक पेनड्राईव्ह दाखवून या संवेदनशील प्रकरणावर सरकारनं निवदेन करावं अशी मागणी केली होती. या मागणीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठवडी प्रस्तावाला उत्तर देताना यावर भाष्य केलं. सगळे आजी-माजी मंत्री एकमेकांकडं पाहू लागले आहेत, असं सांगताना त्यांनी याबाबत निवेदनही केलं.
एक गोष्ट कालपासून या सभागृहात होतेय ती म्हणजे हनी ट्रॅप. कुठला हनी ट्रॅप यांनी आणला मला समजतंच नाही? नानाभाऊंनी कुठला तरी बॉम्बच आणला म्हणे, पण नानाभाऊ आलाच नाही आमच्यापर्यंत बॉम्ब. अशी घटना घडली असेल ती मांडली पाहिजे. पण माहौल असा तयार होतोय आजी-माजी मंत्री आहेत हनी ट्रॅपमध्ये. आता सगळे एकमेकांकडं पाहून राहिले कोण फसलंय या हनीट्रॅपमध्ये! कुठल्याही मंत्र्यांची या हनीट्रॅपबाबत तक्रारही नाही, पुरावेही नाहीत, अशी घटनाही समोर आलेली नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हनीट्रॅपच्या मुद्द्यावर सरकारच्यावतीनं स्पष्टीकरण दिलं.
दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील एक बडा नेता नाशिक दौऱ्यावर आला होता. तेव्हा या नेत्यानं पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना या प्रकरणाबाबत काहीतरी चर्चा केली. त्यानंतर हा मुद्दा मध्यमांमध्ये चर्चेला आला आणि शेवटी तो विधानभवनात पोहोचला. काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी तर आमच्याकडं या हनी ट्रॅपच्या प्रकरणातला पेन ड्राईव्ह असल्याचं सांगताना तो सभागृहात दाखवलाही होता. तसंच या संवेदनशील प्रकरणाची सविस्तर माहिती सरकरला व्हावी यासाठी सरकारनं यावर निवेदन करावं अशी मागणीही केली होती.
दरम्यान, पटोलेंनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं की, सरकारनं हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं असून याची दखलही घेतली आहे. याप्रकरणी आवश्यक ती पावलं उचलली जातील असं आश्वासनही त्यांनी दिलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.