Mahapalika Election update : इच्छुकांसाठी महत्वाची बातमी; महापालिकांच्या आरक्षण सोडतीचा दिवस ठरला, लागा तयारीला...

Maharashtra Election Commission Announces Reservation Draw Schedule : प्रारूप आरक्षण, हरकती व सूचना मागविण्यासाठी विहित नमुन्यात प्रसिध्द करण्याची तारीख 17 नोव्हेंबर ही आहे. हरकती व सूचना मागविण्याची अंतिम तारीख 24 नोव्हेंबर ही असेल.
Local Body Elections
Local Body Electionssarkarnama
Published on
Updated on

Reservation Lottery for Civic Polls : राज्यातील महापालिकांच्या (मुंबई वगळून) आगामी निवडणुकांसाठी आरक्षित जागांची संख्या निश्चित करणे आणि त्या जागांचे संबंधित प्रभागांमध्ये वाटप करण्याबाबतचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने नुकताच काढला होता. त्यानंतर आता या महापालिकांच्या आरक्षण सोडतीचे वेळापत्रकही आयोगाकडून जाहीर करण्यात आले आहे.

राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी मुंबई वगळून उर्वरित सर्व महापालिका आयुक्तांना आरक्षण सोडतीबाबतचे आदेश दिले आहेत. त्याबाबतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून त्यानुसार ही प्रक्रिया 30 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. आरक्षित जागांची संख्या निश्चित करून त्यास राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचा कालावधी 30 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर हा असेल.

आरक्षण सोडतीची जाहीर सूचना 8 नोव्हेंबरला वृत्तपत्रात प्रसिध्द केली जाईल. त्यानंतर 11 नोव्हेंबरला आरक्षणाची सोडत काढली जाईल. आरक्षणाची सोडत काढून सोडतीचा निकाल राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर केला जाईल. प्रारूप आरक्षण, हरकती व सूचना मागविण्यासाठी विहित नमुन्यात प्रसिध्द करण्याची तारीख 17 नोव्हेंबर ही आहे. हरकती व सूचना मागविण्याची अंतिम तारीख 24 नोव्हेंबर ही असेल.

Local Body Elections
Voter List : निवडणूक आयोग 12 राज्यांतील मतदारयाद्या गोठवणार; काय घडलं?

प्रारुप आरक्षणावर प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर विचार करून संबंधित महापालिका आयुक्त अंतिम आरक्षणाबाबत 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत निर्णय घेतील. तर आयोगाच्या मान्यतेनंतर 2 डिसेंबर रोजी अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिध्द केले जाईल, असे आयोगाच्या वेळापत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे.

Local Body Elections
Local Body Elections : ‘स्थानिक’च्या निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट; विरोधकांच्या मोर्चाआधीच आयोगाचा मतदारयाद्यांबाबत मोठा निर्णय

दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाकडून आजच 32 जिल्हा परिषदा व 336 पंचायत समित्यांच्या मतदारयाद्या अंतिम करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. आज अंतिम मतदारयादी प्रसिध्द करण्यात येणार होती. त्याचप्रमाणे आयोगाने दुबार मतदारांबाबत कार्यवाही करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. विरोधकांनी दुबार मतदारांसह मतदारयादीतील अनेक त्रुटी आयोगासमोर सादर केल्या होत्या. याच त्रुटींविरोधात 1 नोव्हेंबर रोजी मुंबईत विरोधकांकडून मोर्चा काढला जाणार आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com