Maharashtra Political Crisis : सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी पार पडली. यावेळी शिवसेना ठाकरे गट गटाने सात न्यायाधिशाच्या घटनापीठाकडे सोपवण्याची मागणी केली आहे. तसेच पुढील महिन्यात म्हणजेच १० जानेवारीपासून सत्तासंघर्षाची मुख्य सुनावणी सुरु होणार असल्याची माहितीही समोर आली आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरची सुनावणी आता थेट येणाऱ्या नवीन वर्षात पार पडणार आहे. यामुळे डिसेंबर महिन्यात याबाबत कोणताही निर्णय होणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. २९ नोंव्हेंबरला हे प्रकरण न्यायालयाच्या पटलावर जाणार होते. मात्र घटनापीठातील एक न्यायमूर्ती आजारी असल्याने कामकाज होऊ शकले नाही. त्यामुळे पुढील सुनावणीसाठी नव्या तारखांबाबत विचार सुरू होता. यामध्ये ख्रिसमसची सुट्टीचा आले असल्याने सुनावणी जानेवारीत होणार आहे.
विशेष म्हणजे, आपल्या आठ पैकी केवळ एका मागणीसाठी ठाकरे गटाने राज्यपालांच्या अधिकाराच्या मुद्द्यासाठी सात न्यायाधिशांच्या घटनापीठाची मागणी केली आहे. त्यामुळे आता 10 जानेवारीला पुढची सुनावणी होणार असली तरी पुढच्या महिन्यातही नियमित सुनावणी होईल की नाही याची शक्यता कमी आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणी वेळी १२ डिसेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीमध्ये कोणतंही महत्त्वाचं प्रकरण घटनापीठ ऐकणार नाही. सत्तासंघर्ष प्रकरण आज न्यायालयात मेंशन केलं गेलं. यामध्ये १० जानेवारीची तारीख दोन्ही बाजूच्या वकीलांकडून मुख्य युक्तिवादासाठी निश्चित करण्यात आले असल्याचे समजते आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.