Pune News : लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे आणि ठाकरे गटांकडून एकमेकांचे आमदार,खासदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात येत आहे. यावरून दोन्ही बाजूच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. यामध्ये आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी उडी घेतली असून ठाकरे गटाच्या नेत्यांवर टीका केली आहे.
शिवसेना शिंदे गटातील काही आमदार आणि खासदार हे उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याच्या वक्तव्य निवडणूक निकालानंतर ठाकरे गटांकडून येत आहे. यावरून गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले, ठाकरे गटात कोणी गेले असतील तर त्यांची नावे सांगावीत. अशा प्रकारचे दावे गेल्या अडीच वर्षांपासून होत असल्याचे मी पहिले आहेत. माझा अशा दाव्यावर अजिबात विश्वास नाही. असं म्हणत ह्या फक्त वावड्या असल्याचे पाटील यांनी सांगितले.
तसेच उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, याबाबत "दोन-तीन दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. मात्र, लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला फक्त महाराष्ट्रातच अपयश आले नाही. तर इतर राज्यात देखील काही ठिकाणी फटका बसला आहे. महाराष्ट्रात अपयश आले असले तरी त्याचा राजीनामा हा त्याला पर्याय असू शकत नाही असं पाटील म्हणाले.
गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, पराभवाला राजीनामा हा पर्याय नसून त्यामध्ये दुरुस्ती करणे हा पर्याय होऊ शकतो. पण राजीनाम्याचा निर्णय हा त्यांचा आणि त्याच्या पक्षचा आहे. मात्र यावर काही तरी तोडगा काढला जाईल असं ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे 7 खासदार निवडून आले आहेत.तर एक जागा आम्हला थोड्याफार मतांनी गमवावी लागली. अन्यथा आमचे 8 खासदार दिलीत गेले असते ,असे गुलाबराव पाटील यांनी म्हंटले आहे. तसेच आता गर्दीमध्ये साप सोडण्याचा काही लोकांचा धंदा करत आहेत. त्यांनी तो साप सोडलेला आहे. मात्र, साप कसा पकडायचा हे आम्हाला ठाऊक आहे. असा टोला पाटील यांनी विरोधकांना लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.