Maharashtra Politics : 'तुमच्यात धमक होती तर काढा ना स्वत:चा पक्ष'; अजित पवारांचे 'ते' भाषण चर्चेत

Ajit Pawar News : अजित पवार यांचे भाषण शेअर करत 'भुजां'मध्ये कितीही 'बळ'आहे असं म्हटलं तरी नीतिमत्तेचे 'तट' फोडून सत्तेसाठी घातलेला हा 'वळसा' महाराष्ट्राला 'पटेल' का? वाह रे पट्ठ्या...!असे कॅप्शन देखील दिले आहे.
Ajit Pawar
Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

Political News : शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या बाजुने निकाल दिला होता. पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना निवडणूक आयोगाने दिले. तसाच निर्णय राष्ट्रवादीच्या फूटीवर लागला आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना दिले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या निकालानंतर अजित पवार यांनी जाहीर सभेत एकनाथ शिंदेंवर टीका केली होती. तुमच्यात धमक होती तर स्वतः पक्ष काढायचा, असा सल्लाच अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना दिला होता. तेच भाषण पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Maharashtra Politics )

Ajit Pawar
Uday Samant On Uddhav Thackeray : 'मंत्रिपद कसं मिळालं...', ठाकरेंचे नाव घेत उदय सामंतांनी केली पोलखोल

आपल्या त्या भाषणात अजित पवार म्हणाले होते 'अरे ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला आणि तो वाढवला मुंबईच्या शिवाजी पार्कवर या पक्षाची स्थापना केली आणि हा पक्ष महाराष्ट्राच्या सर्वदूर पोहोचवला. त्यांचाच पक्ष तुम्ही काढून घेतलात. त्यांचं चिन्ह काढून घेतलं. निवडणूक आयोगाने जरी निर्णय दिला असला तरी हा निर्णय जनतेला पटलाय का, त्याचा विचार झाला पाहिजे. तुमच्यात धमक होती तर स्वतःचा काढा, तुम्हाला कोणी अडवलं होतं?'

मनसेने अजित पवार (Ajit Pawar) यांचे ते भाषण आपल्या ट्विटरवरून शेअर केले आहे. तर, जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी देखील हे भाषण मीडियासमोर दाखवले. या भाषणावर सोशल मीडियावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेनेवेळी वेगळा पक्ष स्थापन करण्याची भूमिका घेणाऱ्या अजित पवारांवर नेटिझन्स त्यांनी वेगळा पक्ष का काढला नाही, असे म्हणत सडकून टीका करत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मनसेने अजित पवार यांना थेट टार्गेट केले आहे. अजित पवार यांचे भाषण शेअर करत 'भुजां'मध्ये कितीही 'बळ'आहे असं म्हटलं तरी नीतिमत्तेचे 'तट' फोडून सत्तेसाठी घातलेला हा 'वळसा' महाराष्ट्राला 'पटेल' का? वाह रे पट्ठ्या...!असे कॅप्शन देखील दिले आहे. या आधी देखील मनसेने बुजुर्ग काकांनी उभा केलेला पक्ष दुसऱ्याच्या बळावर हिसकावणं सोप्प आहे, असे ट्विट करत अजित पवारांपेक्षा राज ठाकरे कसे उजवे आहेत, हे सांगितले होते.

Ajit Pawar
Raj Thackeray On NCP: 'बुजुर्ग काकांचा पक्ष हिसकावणं सोप्प आहे पण...' राज ठाकरेंनी अजित पवारांना सुनावलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com