BJP Congress alliance : सर्वात मोठी राजकीय घडामोड; भाजपकडून एकनाथ शिंदेंचा घात, ठाण्यातच कट्टर विरोधक काँग्रेससोबत युती

Ambarnath municipal council : निवडणुकीत शिवसेनेकडून अंबरनाथची जबाबदारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे देण्यात आली होती. त्यांच्याच कल्याण लोकसभा मतदारसंघात ही नगरपरिषद येते.
BJP Congress Alliance
BJP Congress AllianceSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde setback : महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना आज राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीतील भाजप आणि शिवसेनेमध्ये काही भागांत टोकाचे राजकीय युध्द सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने ठाणे जिल्ह्यातच एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का दिला आहे.

अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून मोठा भाऊ ठरलेल्या शिंदेसेनेचा भाजपने घात केला आहे. राज्यात महायुती असली तरी या नगरपरिषदेत मात्र दोन्ही पक्षांनी परस्परविरोधी भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे. अंबरनाथमध्ये भाजपने शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी थेट कट्टर विरोधक असलेल्या काँग्रेससोबत युती करत सत्ता मिळविली आहे.

नेमकं काय घडलं?

अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना २३ जागांसह मोठा पक्ष ठरला होता. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात होते. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मात्र भाजपच्या तेजश्री करंजुले विजयी झाल्या. निवडणुकीत भाजपला १६ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे शिवसेना-भाजपची युती होणार, असेच मानले जात होते.

BJP Congress Alliance
Tukaram Mundhe update : ‘बोगस’ दिव्यांगांविरोधात तुकाराम मुंढेंनी उचललं मोठं पाऊल; कडक कारवाई होणार...

भाजपने मात्र निवडणुकीनंतर मोठा डाव टाकला. शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत घेतले आहे. काँग्रेसचे १२ तर राष्ट्रवादीचे चार नगरसेवक निवडून आले आहेत. त्यानुसार भाजपने एकूण ३२ नगरसेवकांच्या जोरावर बहुमत मिळविण्यासाठी फिल्डींग लावली आहे.

भाजप आणि काँग्रेसची ही युती शिंदेसेनेच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. ही अभद्र युती असल्याची टीका शिवसेनेने केली आहे. शिवसेनेचा घात केल्याचा आरोप आमदार बालाजी किणीकर यांनी केला आहे. भाजपने मात्र शिवसेनेवरच पलटवार केला आहे. मागील २५ वर्षांपासून भ्रष्टाचार केलेल्या शिंदे गटासोबत गेलो असतो तर ती अभद्र युती ठरली असती, असे भाजपचे उपाध्यक्ष गुलाबराव करंजुले पाटील यांनी म्हटले आहे.

BJP Congress Alliance
Santosh Dhuri News : भाजपमध्ये प्रवेश करताच संतोष धुरींचा थेट राज ठाकरेंवर सर्वात मोठा आरोप; म्हणाले, पक्षासह दोन किल्ले सरेंडर...

दरम्यान, करंजुले पाटील यांनी युतीसाठी शिवसेनेकडूनच प्रतिसाद मिळाला नसल्याचा दावाही करण्यात आला आहे. निवडणुकीत शिवसेनेकडून अंबरनाथची जबाबदारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे देण्यात आली होती. त्यांच्याच कल्याण लोकसभा मतदारसंघात ही नगरपरिषद येते. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसची युती शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का मानली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com