
Delhi News 17 Jan 2025:दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्या उपस्थितीत प्रसिध्द करण्यात आलेल्या या जाहीरनाम्यात दिल्लीकरांसाठी विशेषत:महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजनांचा पाऊस पाडला आहे.
भाजप आपल्या जाहीनाम्याला 'संकल्प पत्र'असे संबोधले आहे. सध्या ज्या विविध जनयोजना सरकारकडून सुरु आहेत. त्या यापुढेही सुरु राहतील, असे नड्डा यांनी सांगितले. महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने आपल्या जाहीरनाम्यात अनेक आश्वासन दिले आहेत.
महिला समृद्धी योजनाच्या माध्यमातून दरमहिन्याला 2500 रुपये देण्यात येणार आहे. होळी आणि दिवाळी सणाला एक गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहे. एलपीजीसाठी 500 रुपयांची सूट देण्यात येणार आहे.
दिल्लीत भाजप सरकार सत्तेत आल्यास गर्भवती महिलांना सरकारकडून 21 हजार रुपये आणि पोषक आहार संच देण्यात येईल, असे नड्डा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दिल्लीत जर भाजपचे सरकार आले तर आयुष्यमान योजना दिल्लीत लागू करण्यात येईल. त्याखेरीज 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा काढण्यात येईल.
दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. 8 फेब्रुवारीला निकाल आहे. सत्ताधारी आपने 2015, 2020 च्या विधानसभा निवडणुकीत अनुक्रमे 67, 62 जागा पटकावल्या होत्या, या निवडणुकीत आप हॅट्रिक करण्याचा तयारीत आहेत. एकूण 1.55 कोटी पेक्षा जास्त मतदार आहेत. आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.