MVA Seat Sharing: जागा वाटपावरून मविआचं घोडं अडलं? निवडणुकीच्या तोंडावर गुंता वाढला...

Seat allocation in Vidha Sabha elections Mahavikas Aghadi Meeting: आघाडीच्या संयुक्त बैठका जरी गणेशोत्सवानंतर होणार असल्या तरी ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या पक्षांच्या अंतर्गत बैठका या यादरम्यान होणार आहेत.
nana patole uddhav thackeray sharad pawar
nana patole uddhav thackeray sharad pawarsarkarnama
Published on
Updated on

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जागावाटपांच्या बैठकीचा सिलसिला सुरू झाला आहे. वाटाघाटीसाठी तीनही पक्षामध्ये बैठका सुरु होत्या. मुंबईतील जागावाटपाबाबत आघाडीच्या सुंयक्त बैठका गणेशोत्सवानंतर होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

जागावाटपसंदर्भातील दोन बैठका झाल्यानंतर आता पुढील बैठका गणेशोत्सवानंतर होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. गणेशोत्सव झाल्यानंतर सुरुवातीला मुंबईतील जागावाटपा संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. त्यानंतर कोकण आणि उर्वरित महाराष्ट्रातील जागा वाटपा बाबत निर्णय घेतला जाणार आहे.

महाविकास आघाडीच्या संयुक्त बैठका जरी गणेशोत्सवानंतर होणार असल्या तरी शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या पक्षांच्या अंतर्गत बैठका या यादरम्यान होत राहतील, त्यासोबत प्रचाराची रणनीती सुद्धा ठरणार आहे.

nana patole uddhav thackeray sharad pawar
Kolhapur Politics: दाजींनंतर मेहुण्यानं घेतली शरद पवारांची भेट; उमेदवारी कुणाला मिळणार?

शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये पक्षांतर्गत सर्वे, जागा वाटपापूर्वी पक्षाकडून तयार करण्यात आलेले अहवाल, महाराष्ट्रातील कोणत्या विभागातील कोणत्या विधानसभा मतदारसंघात आपली ताकद आहे, शिवाय कोणते इच्छुक उमेदवार आहेत, कोणत्या जागा संदर्भात आपण आग्रही असले पाहिजे,या सगळ्या बाबत पक्षांतर्गत चर्चा करतील, असे सांगण्यात आले.

nana patole uddhav thackeray sharad pawar
Shivaji Maharaj Statue: पुतळा कोसळल्याने सरकार चिंताग्रस्त, त्यातूनच वडाची साल पिंपळाला लावण्याचा प्रकार...?

मुंबईतील विधानसभेच्या ३६ जागांवर आघाडीची खलबतं सुरु आहे. ठाकरे गटाने २० ते २२ जागांचा आग्रह केला आहे, तर दुसरीकडे काँग्रेसने १५ ते १७ जागांचा हट्ट धरला आहे. आतापर्यंत झालेल्या बैठकामध्ये जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत आघाडीतील ज्या पक्षांनी जागा जिंकल्या आहेत, त्या वगळता भाजपने जिंकलेल्या १६ जागांवर चर्चा सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com