Mahavikas Aaghadi : महायुती नव्हे तर महाविकास आघाडी 170 चा आकडा गाठणार? 'या' बड्या नेत्यानं थेट निकालच सांगितला

Congress Leader Statement On Assembly Election Result : हरियाणात जे झाले ते महाराष्ट्रात होणार नाही. आम्ही यापासून धडा घेतला आहे. महाविकास आघाडीत योग्य ताळमेळ आणि समन्वय आहे. तीनही पक्षांचे नेते एकत्रित काम करीत आहेत. एकमेकांविषयी असलेली नाराजी दूर करण्यात आम्हाला मोठे यश आले आहे.
INDIA Alliance PC
INDIA Alliance PCSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : विधानसभेच्या निवडणुकीला अवघे पाच दिवस शिल्लक राहिले आहेत. आता कोणी निवडून येणार, कोणाची सत्ता येणार, किती आमदार आघाडी व महायुतीचे किती जागा येणार याची चर्चा सुरू झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी आमचीच सत्ता येणार असल्याचे दावे करत आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव तसेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे समन्वयक अविनाश पांडे यांनी महाविकास आघाडीचे 170 आमदार निवडून येणार असल्याचा दावा केला आहे.

काँग्रेसचे नेते अविनाश पांडे हे पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. सध्या ते उत्तर प्रदेशचे प्रभारी असून महाराष्ट्र निवडणुकीचे समन्वयक म्हणून काँग्रेसनं त्यांची नियुक्ती केली आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी रविवारी (ता.17) नागपूरला प्रचारासाठी येत आहेत. त्यांच्या दौऱ्यापूर्वीच पांडे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर मोठं विधान केलं.

अविनाश पांडे म्हणाले, महविकास आघाडीचा अंदाज १७० जागा जिंकण्याचा आहे. सर्वेतूनही हाच आकडा समोर आला आहे. चार दोन जागा मागेपुढे होत असतात. त्या झाल्यातरी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होणार असल्याचे निश्चित झाले आहे. महाराष्ट्रात परिवर्तनाची लाट दिसून येत आहे.

राजकीय पक्षांची तोडफोड करून भाजप महायुतीचे सरकार आले आहे. हे कोणालच पटले नाही. राजकारण आणि आरोपांशिवाय दोन वर्षांत या सरकारने काहीच केले नाही. त्यामुळे शेतकरी, युवक, बेरोजगार व सर्वासामान्य नागरिकांचा महायुतीच्या सरकारवर रोष आहे. लोकभेच्या निवडणुकीतही तो बघायला मिळाला.

INDIA Alliance PC
Uddhav Thackeray Exclusive Interview: ठाकरे पुन्हा CM होणार की शिवसैनिकाला CM करणार? VIDEO पाहा

हरियाणात जे झाले ते महाराष्ट्रात होणार नाही. आम्ही यापासून धडा घेतला आहे. महाविकास आघाडीत योग्य ताळमेळ आणि समन्वय आहे. तीनही पक्षांचे नेते एकत्रित काम करीत आहेत. एकमेकांविषयी असलेली नाराजी दूर करण्यात आम्हाला मोठे यश आले आहे. मतविभाजन होणार नाही याचीही काळजी घेण्यात आली आहे. प्रत्यके जिल्ह्यात समन्वयक नेमण्यात आले आहेत. मतदान आणि मतमोजणीच्या वेळी काही गडबड होऊ नये याचीही खबरदारी घेण्यात येणार आहे.

याकरिता बुथवरच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. कुठे गडबड होते व होऊ शकते याची माहिती आधीच देण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुकी दरम्यान होणाऱ्या प्रत्येक घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. कुठे गडबड आढळल्यास तत्काळ निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवण्यासाठी व कायदेशीर कारवाई करता यावी याकरिता कायद्याची पदवी असलेले तब्बल हजार कार्यकर्ते नियुक्त केले आहेत.

INDIA Alliance PC
Kolhapur Vidhansabha Election: कोल्हापुरात मुश्रीफ, माने, महाडिकांनी आघाडीला टाकले मागे! निकाल नव्हे तर...

महाराष्ट्रात कुठे काही गैरप्रकार होताना आढळला तर आमच्या दिल्लीतील वॉर रूमला ते कळवतील. तेथून निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली जाणार असल्याचे अविनाश पांडे यांनी सांगतिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com