Mahayuti Government: सरपंच, दूधउत्पादक,OBC बाबत मोठे निर्णय; कॅबिनेट बैठकीतील 'या' आहेत 10 महत्त्वाच्या घोषणा

Cabinet Meeting 10 Big Decisions : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने आपल्या धडाकेबाज निर्णयांचा सिलसिला कायम ठेवला आहे.
Mahayuti  Cabinet Meeting
Mahayuti Cabinet Meeting Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुका आता काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत.त्यामुळे महायुती असो वा महाविकास आघाडी दोन्हींसह सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने आपल्या धडाकेबाज निर्णयांचा सिलसिला कायम ठेवला आहे.

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक सोमवारी(ता.23)पार पडली.ही बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली झाली.या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्‍यासह मंत्रिमंडळातील मंत्र्‍यांची उपस्थिती होती.या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

या बैठकीत घेण्यात आलेला सर्वात महत्त्वाचा निर्णय राज्यातील ग्रामपंचायती संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात सरपंच (Sarpanch) - उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट पध्दतीने वाढ करण्यात आली आहे. तसेच दूधाबाबत चांगला निर्णय घेतले आहे.शेतकर्‍यांना मोठा दिलासा दिला आहे.

अनेक दिवसांपासून करण्यात येत असलेली दूध उत्पादक शेतकर्‍यांची मागणी या बैठकीत मान्य करण्यात आली आहे.त्यात दुधाबाबत चांगला निर्णय घेतले आहे.कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज्यातील 14 आयटीआयचे नामांतरकरण्याचा निर्णय घेतानाच सामाजिक व जातीय समीकरणांचा विचार केल्याचे बोलले जात आहे.

Mahayuti  Cabinet Meeting
BJP Politics : कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांना धक्का, राम शिंदेंनी बालेकिल्ल्यातच लावला सुरुंग

मंत्रिमंडळाच्या बैठकीतील प्रमुख 10 निर्णय:

* CM मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरपंच- उपसरपंच यांचं मानधन दुप्पट

* 2 रुपयांनी दूध दरवाढ

* ठाण्याच्या आयआयटीला धर्मवीर आनंद दिघेंचं नाव

* पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराजांचं नाव देण्याचा निर्णय

* विनायक मेटेंचं नाव आयआयटीला देण्यात आलं आहे.

* एल्फिन्स्टन महाविद्यालयातील आयटीआयला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव

* कोल्हापूरच्या आयटीआयला शाहू महाराज आणि बीडच्या आयटीआयला विनायक मेटेंचं नाव

* ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी एकच पद करण्याचा निर्णय

* ग्रामपंचायतीचं वार्षिक उत्पन्न 75 हजार आहे, त्यांना १० लाखांपर्यत वाढवणार

* 29 सप्टेंबरला मुख्यमंत्री लाडकी बहीण तिसरा हप्ता जमा होणार

* ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ ( नियोजन)

* राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ

* मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्रेतील नव्या संकुलाचे बांधकाम

* जुन्नर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय

* कुणबीच्या तीन पोटजातींचा इतर मागासवर्ग यादीमध्ये समावेश

* शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग 1486 कोटींचा प्रकल्प

* एसटी महामंडळाच्या जमिनी बीओटी तत्वावर विकसित करणार : साठ वर्षांचा भाडेपट्टा करार

* राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ

Mahayuti  Cabinet Meeting
Congress News : ऐन विधानसभेच्या तोंडावर हिंगोलीत काँग्रेसच्या 'डोक्याला शॉट'; दोन गटांत तुंबळ हाणामारी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com