BJP Politics : कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांना धक्का, राम शिंदेंनी बालेकिल्ल्यातच लावला सुरुंग

Rohit Pawar BJP Politics Madhukar Ralebhat : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांना प्रवेश देत रोहित पवार यांची वाटचाल अवघड करण्याची चाल भाजपकडून खेळण्यात आली आहे.
Rohit Pawar, Ram Shinde
Rohit Pawar, Ram ShindeSarkarnama
Published on
Updated on

BJP Politics : कर्जत जामखेडमध्ये आमदार रोहित पवार यांना भाजपने मोठा धक्का दिला आहे. रोहित पवार यांच्या निकटवर्तीय पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश केला आहे.

कर्जत जामखेडचे तालुकाध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात यांच्यासह ठाकरे गटाचे जामखेड तालुकाध्यक्ष संजय काशीद, जामखेड शहराध्यक्ष सुरज काळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार राम शिंदेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांना प्रवेश देत रोहित पवार यांची वाटचाल अवघड करण्याची चाल भाजपकडून खेळण्यात आली आहे. कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवार विरुद्ध राम शिंदे यांचा सामना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Rohit Pawar, Ram Shinde
Raj Thackeray : विधानपरिषदेला माघार, आता थेट CM शिंदेंविरोधात 'हा' शिलेदार लढणार? राज ठाकरेंचा 'ठाणे पॅटर्न'

मधुकर राळेभात हे मागील एका दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होती. ते कुठल्या पक्षात जाणार याची उत्सुकता मतदारसंघात होती. अखेर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेशाच्या आधीच आपण निवडणूक लढण्यास इच्छूक असून तिकीटाची मागणी करणार आहोत. जर तिकीट नाही मिळाले तर रोहित पवार यांच्या विरोधात असणाऱ्या उमेदवाराला सर्व मदत करणार असे देखील राळेभात म्हणाले होते.

Rohit Pawar, Ram Shinde
Chirag Paswan : चिराग पासवान भाजपशी आघाडी तोडणार? निवडणूक जाहीर होण्याआधी घेणार निर्णय...

प्रस्थापित विरुद्ध विस्थापित लढाई

मधुकर राळेभात यांच्या पक्षप्रवेशावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी म्हणाले, कर्जत जामखेडची लढाई प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थाप अशी लढाई आहे. विस्थापितांचे नेतृत्व करणारे यांनी प्रवेश केला आहे. हे सगळे जमिनीवर काम करून हे सगळे वर आले आहे. कोणीही तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मले नाहीत. भाजपची ताकद वाढली आहे.

पवारांना मतदारसंघातच अडकवणार?

विधानसभा निवडणुकीमध्ये रोहित पवार हे शरद पवार गटाकडून महाराष्ट्रभर प्रचार करण्याची शक्यता आहे. आपल्या आक्रमक शैलीने त्यांनी लोकसभेला भाजपवर घणाघाती हल्ला केला होता. त्यामुळे रोहित पवारांना त्यांच्याच मतदारसंघात अडकवून ठेवण्याची रणनीती भाजप आखत असल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com