Dr Chandrakant Mhaske News : 'ससून'चा पदभार स्वीकारताच डॉ. चंद्रकांत म्हस्के ॲक्शन मोडवर, म्हणाले 'यापुढे असे...'

Pune Hit And Run Case : डॉ. म्हस्के यांनी ससून हॉस्पिटलचा कार्यभार स्वीकारला. तसेच त्यांनी 'ससून'च्या डॉक्टरांबरोबर हॉस्पिटल मधील वॉर्ड, ओपीडी तसेच हॉस्पिटलमधील सर्व विभागांची पाहणी केली.
Dr Chandrakant Mhaske
Dr Chandrakant Mhaskesarkarnama
Published on
Updated on

सागर आव्हाड

Pune Hit And Run News : कल्याणी नगर हिट अँड रन प्रकरणात अनेक धक्कादायक प्रकरणे पुढे येत आहे. 'ससून'मध्ये अल्पवयीन आरोपीचे ब्लड स्मॅपल बदलण्यात आले. त्यामुळे दोन डाॅक्टरांचे तर एक कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले. 'ससून'चे डीन विनायक काळे यांनी या प्रकरणात दोषी डाॅ.अजय तावरे याची नियुक्ती मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पत्रामुळे केली असल्याचे जाहीर केले. पत्रकार परिषदेमध्ये हे जाहीर केल्यानंतर अवघ्या काही तासांत विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. काळे यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार बारामतीमधील अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे देण्यात आला.

आज (गुरुवारी) डॉ. म्हस्के यांनी ससून हॉस्पिटलचा कार्यभार स्वीकारला. तसेच त्यांनी 'ससून'च्या डॉक्टरांबरोबर हॉस्पिटल मधील वॉर्ड, ओपीडी तसेच हॉस्पिटलमधील सर्व विभागांची पाहणी केली. तसेच विभाग प्रमुखांची बैठक बोलावली आहे. तसेच सर्वांना नियमा प्रमाणे काम करण्याची ताकीद त्यांनी दिली आहे. हिट अँड रन प्रकरणात जे घडले त्या विषयी त्यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, यापुढे असं होणार नाही याची खबरदारी घेण्यात येईल.

Dr Chandrakant Mhaske
Hit And Run Case : उंदराच्या चाव्याने रुग्णाचा मृत्यू ते ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार व्हाया ड्रग्ज रॅकेट! 'ससून' रुग्णांसाठी 'वरदान' की...

डॉ. काळे सक्तीच्या रजेवर

ससूनचे डीन डॉ. विनायक काळे vinayak kale यांनी बुधवारी (ता.29) पत्रकार परिषद घेतली होती . ससून चौकशी समितीने केलेल्या चौकशी संदर्भात माहिती त्यांनी या पत्रकार परिषदेत दिली होती. डॉ. अजय तावरे यांच्याकडून न्याय वैद्यकशास्त्र विभाग प्रमुख चार्ज काढून घेतला आहे. डॉ. विजय जाधव यांच्याकडे चार्ज दिला आहे. अतुल घटकांबळे हा शिपाई आहे. त्याला निलंबित केलं आहे. अशी माहिती त्यांनी दिली होती. मात्र तावरे यांच्या नियुक्तीवर त्यांनी केलेल्या भाष्यानंतर काही तासांतच त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते.

आव्हानांचा डोंगर

'ससून'ची Sassoon प्रतिमा मागील काही काळामध्ये घडलेल्या प्रकरणांमुळे मलिन झाली आहे. रुग्णाचा उंदराने चावा घेतल्याने मृत्यू झाल्याचे प्रकरण घडले. त्यानंतर ड्रग्ज तस्करीचा आरोपी देखील ससून रुग्णालयातून पळून गेला होता. त्यानंतर आता हिट अँड रन प्रकरणात ससूनमधील दोन डाॅक्टरांसह एक कर्मचारी निलंबित झाला आहे. त्यामुळे 'ससून'ची प्रतिमा पु्न्हा उंचावण्याच्या आव्हान डाॅ. मस्केंच्या समोर असणार आहे.

(Edited By Roshan More)

Dr Chandrakant Mhaske
Ravindra Dhangekar News : 'बाहेरून बंद आतून सुरू...', रवींद्र धंगेकर आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत केली 'ही' मागणी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com