Shivsena News: अमित ठाकरे माहीम मतदारसंघातून मनसेचे उमेदवार आहेत. या मतदारसंघात शिवसेनेकडून सदा सरवणकर यांना उमेदवार जाहीर झाली आहे. मात्र, सदा सरवणकर यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यात आज (रविवारी) सदा सरवणकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली.
सरवणकर हे उद्या (सोमवारी) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे ते उमेदवारी अर्ज भरणार की माघार घेणार याविषयी आजच निर्णय घेण्याची शक्यता आहे. 'साम टिव्ही'ने दिलेल्या वृत्तानुसार मुख्यमंत्री शिंदे यांनी 24 तासाच्या आत सरवणकर यांनी निर्णय घ्यावा, अशा सूचना केल्या आहेत.
लोकसभेला राज ठाकरे यांनी आपल्याला पाठींबा दिला त्यामुळे आता आपण त्यांना पाठींबा द्यायला हवा, अशा महायुतीमध्ये चर्चा आहेत. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी महायुतीने अमित ठाकरेंना पाठींबा द्यावा, असे म्हटले होते.
माहिमच्या जागेवरून सदा सरवणकर यांची काल (शनिवारी) दीपक केसरकर यांनी भेट घेतली होती. त्याआधी केसरकर हे राज ठाकरेंना भेटले होते. त्यामुळे सरवणकर हे काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले होते. मात्र, सरवणकर यांनी काल (शनिवारी) स्पष्ट केले होते की ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव नाही. मुख्यमंत्र्यांचा त्यांना पाठींबा आहे.
शनिवारी सरवणकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आज (रविवारी) ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेटले. या भेटीत माहीमच्या जागेवर चर्चा झाल्याची माहिती आहे.
माहीम मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्याकडून महेश सावंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 2019 ला आदित्य ठाकरे यांना मनसेने पाठींबा दिला होता. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अमित ठाकरेंना पाठींबा देतील अशी शक्यता होती. मात्र, पक्षाकडून महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.