NCP Ajit Pawar : अजितदादांनी भाकरी फिरवली! राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकारिणीमध्ये मोठे बदल; 'या' दोन तरुण चेहऱ्यांना संधी

NCP Ajit Pawar Major changes in the executive : आगामी विधानसभेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकारिणीमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता अजितदादांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाकरी फिरवल्याचं दिसत आहे.
Ajit pawar NCP
Ajit pawar NCPSarkarnama
Published on
Updated on

NCP Ajit Pawar News : आगामी विधानसभेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकारिणीमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता अजितदादांनी (Ajit Pawar) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाकरी फिरवल्याचं दिसत आहे.

नवीन बदलानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दोन युवा चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्यानुसार आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मुख्य राष्ट्रीय प्रवक्तेपदी राज्याचे कृषीमंत्री धनजंय मुंडे (Dhanjay Munde) यांची निवड केली आहे. तर प्रदेश प्रवक्तेपदी, विधानपरिषदचे नवनिर्वाचित आमदार राजेश विटेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या निवडीच्या माध्यमातून अजित पवार यांनी पक्षातील युवा चेहऱ्यांना संधी दिल्याचं पाहायला मिळत आहे. तर पक्षाच्या प्रवक्तेपदी मुंडे (Dhanjay Munde) आणि विटेकर यांची निवड करण्यात आल्याची माहिती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन दिली आहे. तसेच यावेळी त्यानी त्यांनी नवनिर्वाचित दोन्ही प्रवक्त्यांना शुभेच्छा दिल्या.

अजितदादांनी (Ajit pawar) एक्सवर एक पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दीली आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे, "राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुख्य राष्ट्रीय प्रवक्तेपदी, राज्याचे कृषीमंत्री श्री. धनजंय मुंडे यांची, तर प्रदेश प्रवक्तेपदी, विधानपरिषदचे नवनिर्वाचित आमदार श्री. राजेश विटेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षातील युवा चेहरे वेगवेगळ्या व्यासपीठांवर पक्षाचा आवाज ठामपणे मांडतील यात शंका नाही. दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!"

अजितदादा 'अ‍ॅक्टिव्ह मोड'वर

लोकसभा निकालानंतर अजितदादा चांगलेच 'अ‍ॅक्टिव्ह मोड'वर आले आहेत. लोकसभेतील पराभव पचवून आगामी विधानसभेच्या निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी दादांनी दंड थोपटले आहेत. शिवाय यासाठी त्यांनी बैठका आणि सभांचा धडाका लावला आहे. नुकतेच त्यांनी बारामतीत जनसन्मान रॅली काढली. यानिमित्ताने त्यांनी पुन्हा एकदा नव्या जोमाने निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा संकल्पदेखील केला.

Ajit pawar NCP
Ajit Pawar : विशाळगड हिंसाचारातील पीडितांना अजितदादांचा शब्द; म्हणाले, तोपर्यंत रहिवासी अतिक्रमणाला हात लावणार नाही

शिवाय लोकसभेच्या निकालानंतर पक्षात आलेलं नैराश्य दूर करण्यासाठी अजित पवारांनी पक्षात काही बदल केल्याचं दिसत आहे. आजच्या प्रवक्तेपदाच्या निवडीमध्ये त्यांनी तरुण चेहऱ्यांना संधी देऊन तरुण वर्गाला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता येत्या निवडणुकीत तरुणांची साथ दादांच्या राष्ट्रवादीला किती मिळणार हे येणारा काळच सांगणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com