Thane Political News: नरेश म्हस्के धर्मवीरांचा गड राखणार का?

CM Eknath Shide News: "वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी मोठ्या कष्टाने उभी केलेली शिवसेना आज काँग्रेसच्या दावणीला बांधली गेली आहे."
Anand Dighe
Anand DigheSarkarnama

Thane Lok Sabha Constituency: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना प्रचंड बहुमताने निवडून लोकसभेत पाठवा असं आवाहन​मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारांना केलं. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांच्या प्रचारासाठी आज शुक्रवारी (17 मे) रोजी नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार रॅलीत मुख्यमंत्री शिंदे सहभागी होते. यावेळी त्यांनी वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी अभेद्य राखलेला हा गड यापुढेही अभेद्य राखा असं आवाहनही मतदारांना केलं.

नवी मुंबईतील कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली भागात काढण्यात आलेल्या मस्के (Naresh Mhaske) यांच्या प्रचार रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक सहभागी झाले होते. स्थानिक लोकांनी जागोजागी मोठ्या उत्साहात या रॅलीचे स्वागत केले. नवी मुंबईकरांनी या रॅलीला उदंड प्रतिसाद दिल्याचं दिसून आलं. या रॅलीत बोलताना मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, "राज्यातील सरकारने मागील 2 वर्षात आणि केंद्र सरकारने 10 वर्षात केलेल्या विकासकामांच्या जोरावर ही निवडणूक पार पडत आहे. देशाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारी ही निवडणूक असून या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्केंना मोठ्या मताधिक्याने विजयी करा."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अटल सेतू, मुंबई-पुणे मिसिंग लिंक, ऐरोली-काटई बोगदा, नवी मुंबई मेट्रो, नवीन विमानतळ यामुळे नवी मुंबई शहराचा चेहरामोहरा आगामी काळात पूर्णपणे बदलणार असून नवी मुंबई एक सुनियोजित आणि सर्व सुविधांनी संपन्न शहर म्हणून ओळखले जाईल. त्यामुळे विकासाचा वेग कायम राखायचा असेल तर महायुतीशिवाय पर्याय नाही, असंही शिंदे म्हणाले.

कष्टाने उभी केलेली शिवसेना काँग्रेसच्या दावणीला

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) साहेब यांनी मोठ्या कष्टाने उभी केलेली शिवसेना आज काँग्रेसच्या दावणीला बांधली गेली आहे. मुंबई (Mumbai) बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी यांना प्रचारासाठी लागतो. पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या काँग्रेसची हे पाठराखण करत आहेत. तसेच ते फारूख अब्दुल्लाच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत.

त्यामुळे राम मंदिर उभारणाऱ्या, 370 कलम हटवणाऱ्या तसेच सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला जशास तसे उत्तर देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी नरेश म्हस्के यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. त्यामुळे आता नरेश म्हस्के हे धर्मवीरांचा गड राखणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

(Edited By Jagdish Patil)

Anand Dighe
Eknath Shinde News: 800 कोटींचा आरोप, पालकमंत्र्यांसह संपूर्ण शिंदेसेना मुख्यमंत्र्यांच्या बचावाला धावली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com