Manikrao Kokate Case : मुंबई हायकोर्टात कोकाटेंच्या याचिकेला सरकारचा विरोध; लोकप्रतिनिधी आहेत म्हणून सूट नको...

Bombay High Court order : हायकोर्टाकडून सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर आज कोकाटेंच्या याचिकेवर निकाल दिला जाणार असल्याचे स्पष्ट आहे.
Minister Manikrao Kokate
Minister Manikrao Kokate Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra legal news : सदनिका गैरव्यवहार प्रकरणी अडचणीत आलेल्या माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. नाशिक कोर्टाने दिलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला त्यांनी हायकोर्टात आव्हान दिले आहे. त्यांच्या याचिकेविरोधात हस्तक्षेप याचिकाही दाखल झाल्या आहेत. तसेच सरकार पक्षानेही कोकाटेंच्या याचिकेला विरोध केला आहे.

कोकाटे यांच्याविरोधात नाशिकमधील कोर्टाने अटक वॉरंट जारी केले आहेत. त्यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलीस मुंबईतही दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे शिक्षेला स्थगिती देण्याच्या कोकाटेंच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. या याचिकेवर आजच निकाल देण्याचा निर्णय कोर्टाने घेतला आहे.

हायकोर्टाच्या ज्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे, त्या न्यायमूर्तींनी आजच निकाल देण्याच्या उद्देशाने इतर सर्व प्रकरणांच्या सुनावण्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे कोर्टाकडून सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर आज कोकाटेंच्या याचिकेवर निकाल दिला जाणार असल्याचे स्पष्ट आहे.  

Minister Manikrao Kokate
Local Body Election Result : महाराष्ट्राच्या निकालाआधी उत्तरेकडील राज्यात भाजपची धुळधाण; ‘स्थानिक’च्या निवडणुकीत अपक्षांपेक्षाही कमी जागा

दरम्यान, सरकारी वकिलांनी कोकाटे यांच्या याचिकेला विरोध केला आहे. ते लोकप्रतिनिधी आहेत म्हणून त्यांना सूट देऊ नये, असेही त्यांनी कोर्टात स्पष्ट केले. तर कोकाटेंच्या वकिलांनी शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करताना ते आमदार असल्याचे सांगितले. स्थगिती न दिल्यास त्यांची आमदारकी रद्द होईल, असे वकिलांनी सांगितले.

Minister Manikrao Kokate
PM Modi Priyanka Gandhi : लोकसभेतील वादळी चर्चेनंतर पहिल्यांदाच PM मोदींसमोर आल्या प्रियांका गांधी; सुप्रिया सुळे, लंकेंचीही उपस्थिती, काय झाली चर्चा?

कोकाटे यांनी बनावट कागदपत्रे तयार केली नाहीत. त्यांना सदनिका मिळाली त्यावेळी त्यांची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. नंतर आर्थिक स्थिती सुधारली. आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर सदनिका परत द्यावी, असा नियम नाही, असेही कोकाटे यांच्या वकिलांनी कोर्टात सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com