Manikrao Kokate News : कृषिमंत्रिपद गेल्यानंतर माणिकराव कोकाटेंनी उचललं मोठं पाऊल; रोहित पवार अडचणीत?

Manikrao Kokate Sends Defamation Notice to Rohit Pawar : माणिकराव कोकाटे यांनी वकिलांमार्फत पाठविलेल्या नोटिसीमध्ये रोहित पवार यांच्या 22 जुलैच्या सोशल मीडियातील पोस्टवर आक्षेप घेण्यात आला आहे.
Rohit Pawar On Manikrao Kokate
Rohit Pawar On Manikrao Kokate Sarkarnama
Published on
Updated on

Viral Mobile Rummy Video Controversy : विधान परिषदेत मोबाईल रमी खेळताना व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर माणिकराव कोकाटे चांगलेच अडचणीत आले होते. रमी प्रकरणामुळे त्यांना आपले कृषिमंत्रिपद गमवावे लागले. त्यांचे खाते बदलून क्रिडा व युवक कल्याण हा विभाग त्यांना देण्यात आला आहे. आता कोकाटेंनी मोठं पाऊल उचलले आहे.

माणिकराव कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना थेट मानहानीची नोटीस पाठविली आहे. रोहित पवार यांनीच सोशल मीडियातून ही माहिती दिली. त्यांनी ही नोटीसही पोस्ट केली आहे. तुम्ही पत्ते खेळत होतात हे मी पुराव्यासकट प्रुफ केलं होतं आणि उद्या देखील पुराव्यासकट प्रुफ करेल, असे पवारांनी म्हटले आहे.

रोहित पवार यांनी पोस्टमध्ये कोकाटेंच्या नोटिसीची खिल्ली उडवली आहे. त्यांनी म्हटले आहे की, माजी कृषिमंत्र्यांचा सभागृहात पत्ते खेळतानाचा व्हिडीओ जगजाहीर केला म्हणून मला मानहानीच्या दाव्याची नोटीस आलीय. कोकाटे साहेब तुमचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती, त्यामुळे एवढे मोठे कांड करूनही वाचलात.

Rohit Pawar On Manikrao Kokate
PM Modi News : पंतप्रधान मोदींचा लालूंना मोठा धक्का; वातावरणच फिरवलं... 2 आमदार थेट स्टेजवरच आले

मानहानीची एवढी काळजी होती तर पत्ते खेळण्याचे कुटाणे केलेच कशाला? शेतकऱ्यांप्रती असलेला आपला कळवळा आणि आपण केलेले पराक्रम सांगण्याची वेगळी गरज नाही, असे रोहित पवार यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे. तुम्ही पाठवलेली नोटीस मजेशीर आहे, नोटीस वाचून हसू आवरता आले नाही. पण लक्षात ठेवा, पुराव्याशिवाय मी बोलत नाही. तुम्ही पत्ते खेळत होतात हे मी पुराव्यासकट प्रुफ केलं होतं आणि उद्या देखील पुराव्यासकट प्रुफ करेल, असेही पवार यांनी स्पष्ट केले आहे.

Rohit Pawar On Manikrao Kokate
Bihar SIR Update : राहुल गांधी मतचोरीवरून रान उठवत असतानाच सुप्रीम कोर्टाची नाराजी; राजकीय पक्षांना लावले कामाला...

दरम्यान, माणिकराव कोकाटे यांनी वकिलांमार्फत पाठविलेल्या नोटिसीमध्ये रोहित पवार यांच्या 22 जुलैच्या सोशल मीडियातील पोस्टवर आक्षेप घेण्यात आला आहे. या पोस्टमध्ये बदनामी झाल्याचे नोटिसीमध्ये म्हटले आहे. तसेच नोटीस प्राप्त झाल्यानंतर आठ दिवसांच्या आत अधिकृत सोशल मीडिया हँडल आणि वृत्तपत्रांतून जाहीर माफी मागावी, अन्यथा कोर्टात दावा दाखल करण्याचा इशारा कोकाटे यांनी रोहित पवारांना दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com