Manikrao Kokate case : माणिकराव कोकाटेंची आमदारकी जाणार की राहणार? कोर्टाचे नेमके आदेश काय? समजून घ्या...

Bombay High Court verdict : कोर्टाने शिक्षेनंतर तुरूंगात रवानगीला स्थगिती दिली आहे. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अटकेची तत्परता नाही, हा युक्तीवाद कोर्टाने मान्य केला.
Manikrao Kokate Ajit Pawar
Manikrao Kokate Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

MLA membership disqualification : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांना आज मुंबई हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. नाशिकमधील कोर्टाने त्यांना सदनिका गैरव्यवहार प्रकरणी दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. तसेच अटक वॉरंटही जारी करण्यात आले होते. याविरोधात कोकाटेंनी हायकोर्टात याचिका दाखल केल्या होत्या. त्यावर झालेल्या सुनावणीनंतर कोर्टाने कोकाटेंना जामीन मंजूर केला आहे.

कोर्टात दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर निकाल देण्यात आला. कोर्टाने कोकाटे यांच्याविरोधातील अटक वॉरंटला स्थगिती देत एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तुर्तास तरी त्याची अटक टळली आहे. वैदयकीय कारणास्तव त्यांना जामीन मंजूर करण्यात आल्याचे वकिलांकडून सांगण्यात आले.

याचिकाकर्ते आशुतोष राठोड आणि त्यांचे वकील श्रध्दा दुबे-पाटील यांनी कोर्टाच्या निकालाची माहिती देताना कोकाटेंची आमदारकी वाचणार नाही, असे स्पष्ट केले. एका वृत्तवाहिनी बोलताना राठोड म्हणाले, शिक्षेला स्थगिती नसल्याने लोकप्रतिनिधी कायदयाप्रमाणे ते अपात्र ठरतात. सुप्रीम कोर्टात ते जाण्याची शक्यता लक्षात घेऊन आम्ही आजच सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल करत आहोत.

Manikrao Kokate Ajit Pawar
Local Body Election Result : महाराष्ट्राच्या निकालाआधी उत्तरेकडील राज्यात भाजपची धुळधाण; ‘स्थानिक’च्या निवडणुकीत अपक्षांपेक्षाही कमी जागा

कोर्टाने शिक्षेनंतर तुरूंगात रवानगीला स्थगिती दिली आहे. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अटकेची तत्परता नाही, हा युक्तीवाद कोर्टाने मान्य केला. परंतू शिक्षा झाल्याने लोकप्रतिनिधी कायद्यानुसार त्यांची आमदारकी १६ डिसेंबरलाच गेली आहे. आजच्या कोर्टाच्या निर्णयानेही त्यांची आमदारकी तांत्रिकदृष्ट्या गेली, असे राठोड यांनी स्पष्ट केले.

Manikrao Kokate Ajit Pawar
PM Modi Priyanka Gandhi : लोकसभेतील वादळी चर्चेनंतर पहिल्यांदाच PM मोदींसमोर आल्या प्रियांका गांधी; सुप्रिया सुळे, लंकेंचीही उपस्थिती, काय झाली चर्चा?

वकील श्रध्दा दुबे-पाटील यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, शिक्षेला स्थगिती देण्याची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे आमदारकी जाणार आहे. जामीन मिळाला असला तरी खालच्या कोर्टाने दिलेली शिक्षा अजूनही कायम आहे. त्यावर कोर्टाने स्टे दिलेला नाही. पण जामीन मंजूर केला आहे. खालच्या कोर्टाने दिलेली शिक्षा चुकीची असल्याचे कोर्टाने म्हटलेले नसल्याचे श्रद्दा दुबे-पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कोकाटेंची आमदारकी जाणार की वाचणार, याबाबतचा संभ्रम वाढला आहे. हायकोर्टात कोकाटेंच्या याचिकेवर सुनावणी सुरूच राहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com