क्रुझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास वानखेडेंकडे राहणार की नाही? 'एनसीबी'ने केला मोठा खुलासा

बुधवारी सुमारे चार तास वानखेडे यांची चौकशी झाल्याचे समजते.
Sameer Wankhede and Gyaneshwar Singh
Sameer Wankhede and Gyaneshwar Singh File Photo
Published on
Updated on

मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. बुधवारी सुमारे चार तास त्यांची चौकशी झाल्याचे समजते. आजही त्यांची चौकशी केली जाणार आहे. मात्र, असे असले तरी क्रुझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास त्यांच्याकडून काढून आलेला नाही.

महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि क्रूझ पार्टी प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपांमुळे वानखेडे यांची खात्यांतर्गत चौकशी सुरू केली आहे. या चौकशीसाठी एनसीबीचे 5 सदस्यांचे पथक दिल्लीहून आज मुंबईत दाखल झाले आहे. या पथकात एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वरसिंह यांच्यासह 5 अधिकारी आहेत. या पथकाने बुधवारी वानखेडे यांचा जबाब नोंदवला आहे.

Sameer Wankhede and Gyaneshwar Singh
होय, निकाहनामा खराच! क्रांती रेडकरचा मलिकांवर पलटवार

ज्ञानेश्वरसिंह यांनी याबाबत स्पष्ट केलं आहे. ते म्हणाले, वानखेडे यांची चौकशी केली जात आहे. या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे त्यांच्याकडून घेण्यात आली आहेत. गरज भासल्यास पुन्हा चौकशी केली जाईल. त्यांच्याविरोधक कोणतेही पुरावे आढळून येईपर्यंत क्रुझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास त्यांच्याकडेच राहील, असंही ज्ञानेश्वरसिंह यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे वानखेडे यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, बुधवारी चौकशी पथकासमोर हजर झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना वानखेडे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचा पुनर्रचार वानखेडे यांनी केला. एनसीबीकडून साईल यांच्यासह सर्वच साक्षीदारांचे जबाब घेतले जाणार आहेत.

साईलने वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आर्यन खानला सोडण्यासाठी मध्यस्थातर्फे २५ कोटी रुपयांची मागणी शाहरुख खानकडे करण्यात आली होती, असा दावाही साईलने केला आहे. वानखेडे यांनी सांगितल्यानंतर आपण पंच म्हणून कोऱ्या कागदावर सही केल्याचेही साईल यांनी सांगितले होते. आपल्या जीवाला धोका असल्याने एवढे दिवस आपण गप्प होतो, असा दावा प्रभाकर साईल यांनी केला होता.

Sameer Wankhede and Gyaneshwar Singh
क्रूझ ड्रग्स प्रकरणातील किरण गोसावीला पुणे पोलिसांकडून अटक

क्रूझ पार्टीप्रकरणात पुरावे म्हणून साईलने काही फोटो आणि व्हिडीओ देखील सादर केले आहेत. त्यातील एका व्हिडीओमध्ये आर्यनला अटक करून एनसीबी कार्यालयात आणल्यानंतर किरण गोसावी आर्यन खानजवळ बसून त्याच्या फोनवरून कुणाशी तरी बोलणे करून देत असल्याचे दिसत होते. साईल यांला आता मुंबई पोलिसांनी संरक्षण दिले आहे. त्याच्या तक्रारीवर पोलिसांनी कार्यवाही सुरू केली आहे.

Sameer Wankhede and Gyaneshwar Singh
ज्ञानदेव वानखेडेंची कबुली; निकाहनामा खरा पण...

वानखेडे यांची खात्यांतर्गत चौकशी सुरू झाल्याची माहिती एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वरसिंह यांनी दिली होती. ते म्हणाले होते की, या प्रकरणी उपमहासंचालकांनी दिलेला अहवाल एनसीबीच्या संचालकांना मिळाला आहे. त्यांनी या प्रकरणी दक्षता विभागाला चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मुख्य दक्षता अधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीने या प्रकरणाची चौकशी करतील. चौकशी आताच सुरू झाली असून, कोणत्याही अधिकाऱ्याबद्दल लगेच टिप्पणी करणे योग्य ठरणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com