पुणे : क्रूझ ड्रग्स प्रकरणाला दररोज नवीन खुलासे होत आहेत. यातील पंच प्रभाकर साईलच्या (Prabhakar Sail) आरोपांमुळे या प्रकरणाला अनेक वळणं मिळाली आहेत. साईलने गंभीर आरोप केलेला किरण गोसावीला अखेर पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
पुणे पोलिसांनी दावा केला आहे की, किरण गोसावीनं (Kiran Gosavi) सरेंडर केलेलं नसून आम्ही आमच्या इंटलिजेंसच्या आधारे त्याला अटक केली आहे. प्रभाकर साईल (Prabhakar Sail) आर्यन खानला ज्या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलं आहे, त्या मुंबई क्रूझ ड्रग्स (Mumbai Cruise Drug Case) प्रकरणातील पंच आहे. तर दुसरा पंच असलेल्या किरण गोसावीचा बॉडिगार्डही आहे. प्रभाकर साईलनं माध्यमांसमोर येत गौप्यस्फोट केल्यापासूनच किरण गोसावी फरार होता. तो लखनौमध्ये असल्याची माहिती मिळाली होती. याप्रकरणी पुणे पोलीस आयुक्त सकाळी 11 वाजता माध्यमांशी संवाद साधणार आहेत.
त्या संभाषणाच्या आधारे पुणे पोलिसांची एक तुकडी त्याला पकडण्याकरीता लखनऊला रवाना झाले होते. पण तो तिथूनही पोलिसांना चकवा देत फरार झाला आहे.अखेर पुणे पोलिसांनी किरण गोसावीच्या मुसक्या आवळण्यात यश आल्याची माहिती समोर आली आहे. त्याला दुपारी कोर्टत हजर करणार आहेत. या बाबतची माहिती सहपोलीस आयुक्त रवींद्र सिसवे यांनी दिली आहे.
किरण गोसावीवर ड्रग्ज प्रकरणातील चौकशीशी संबंधित अनेक गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. किरण गोसावीने आर्यन खान प्रकऱणात पैसे घेतल्याचा आरोपही त्याच्यावर लावण्यात आला आहे.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्यावर पंच प्रभाकर साईल यांनी गंभीर आरोप केल्यानंतर आणखी एका पंचाने वानखेडेंवर काल गंभीर आरोप केले आहेत. नवी मुंबईतील शेखर कांबळे (Shekhar Kamble) नावाच्या व्यक्तीने वानखेडेंवर आरोप केले आहेत.
नायजेरियन प्रकरणात शेखर कांबळे व त्याच्या एका मित्राला पंच साक्षीदार बनवण्यात आलं होतं. दहा कोऱ्या कागदावर त्यांच्या सह्या घेण्यात आल्या. याबद्दल विचारणा केली असता 'आम्ही त्यावर नंतर लिहू' असं त्यांना सांगण्यात आलं होतं. . एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दहा कोऱ्या कागदांवर माझ्या सह्या घेतल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे.
शेखर कांबळे म्हणाले की, या प्रकरणात ज्या दोघांना पकडण्यात आलं होतं, त्यांच्याकडं कुठलंही ड्रग्ज सापडलेलं नव्हतं. असं असतानाही त्यांच्याकडं ६० ग्रॅम ड्रग्ज सापडल्याचं नमूद करण्यात आलं, दहा कोऱ्या कागदावर आमच्या सह्या घेण्यात आल्या. याबद्दल विचारणा केली असता 'आम्ही त्यावर नंतर लिहू' असं त्यांना सांगण्यात आलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.