Nawab Malik : भाजपच्या विरोधानंतर नवाब मलिकांनी थेटच सांगितलं; म्हणाले, अजित पवारांशिवाय...

Mankhurd Shivajinagar Assembly Constituency: मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून नवाब मलिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
Nawab Malik, Sana Malik
Nawab Malik, Sana MalikSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : माजी मंत्री नवाब मलिक यांच्या उमेदवारीवरून महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. मलिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा एबी फॉर्म जोडत उमेदवारी अर्ज भरल्यानंतर भाजपने त्याला विरोध दर्शवला आहे. या विरोधानंतर मलिकांनीही हे अपेक्षितच होते असे म्हणत काळजीचे कारण नसल्याचे सांगितले आहे.

मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून मलिकांनी अर्ज दाखल केला आहे. याच मतदारसंघातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचाही उमेदवार आहे. तोच महायुतीचा अधिकृत उमेदवार असून त्यांचाच प्रचार करणार असल्याचे भाजप नेत्यांनी स्पष्ट केले आहे.

Nawab Malik, Sana Malik
Mahayuti Politics : शिंदे, फडणवीस अन् अजितदादा ‘या’ दोन मतदारसंघात करणार नाहीत एकत्रित प्रचार?

भाजपच्या या भूमिकेवर बोलताना नवाब मलिक म्हणाले, मानखूर्द-शिवाजीनगर या मतदारसंघात शिवसेनेचे सुरेश पाटील उमेदवार आहेत. भाजप त्यांना मदत करत आहे. माझ्या मुलीच्या मतदारसंघातही तीच स्थिती आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना मला विरोध करत असले तरी माझ्यासाठी काळजीचे कारण नाही. ते अपेक्षितच होते.

दोन्ही मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने आम्ही निवडून येऊ. लोकांनीच मला निवडणूक लढण्याचा आग्रह केला. भाजप, शिवसेनेचा विरोध असला तरी मला लोकांचा पाठिंबा आहे. अजित पवारांनी भाजपसोबत राजकीय युती केली आहे. आम्ही धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही व्यवस्थेला मानणारे आहोत. राज्यात अजित पवारांशिवाय कोणतेही सरकार येऊ शकत नाही, हे स्पष्ट आहे. ते विचारधारेशी तडजोड करत नाहीत, असे मलिकांनी स्पष्ट केले.

Nawab Malik, Sana Malik
Raj Thackeray : 'राजकारणातील पुतण्यांचा 'डीएनए' काढणाऱ्या भुजबळांना राज ठाकरेंचा चिमटा; म्हणाले,'तेही पुतण्यासोबतच…'

मलिकांचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीची सत्ता असताना देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांकडून करण्यात आला होता. त्यानंतर मलिक काही महिने तुरुंगातही होत. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते विधानसभेत आले होते. त्यानंतर फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत मलिकांच्या उमेदवारीमुळे वाद निर्माण झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com