Manoj Jarange: "आरक्षणाची लढाई जिंकलो" जरांगेंची घोषणा; अखेर पाच दिवसांनी उपोषण घेतलं मागे

Manoj Jarange: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी अखेर आज पाच दिवसांनी आपलं उपोषण मागे घेतलं.
Manoj Jarange
Manoj Jarange
Published on
Updated on

Manoj Jarange: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी अखेर आज पाच दिवसांनी आपलं उपोषण मागे घेतलं. हैदराबाद गॅझेटियरसह इतर गॅझेटियर लागू करण्याच्या मागण्या सरकारनं मान्य केल्यानंतर जरांगेंनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. मंत्रीमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे यांनी सरबत पाजून त्यांचं उपोषण सोडलं. यानंतर मनोज जरांगे यांना अश्रू अनावर झाले. अखेर आरक्षणाची लढाई जिंकलो अशी घोषणा यावेळी मनोज जरांगे यांनी केली.

Manoj Jarange
Shivendraraje Bhosale: सातारा गॅझेटियरची जबाबदारी माझी! मी खोटा शब्द देणार नाही; शिवेंद्रराजेंचा जरांगेंना दिला शब्द

सकाळी मंत्रीमंडळाच्या उपसमितीची बैठक पार पडली त्यानंतर समितीनं जरांगेंच्या मागण्यांच्या मान्यतेचा प्रारुप मसुदा तयार केला. हा मसुदा घेऊन उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आपल्या समितीतील काही सदस्यांसह उपोषणस्थळी पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री उदय सामंत, शिवेंद्रराजे भोसले, माणिकराव कोकाटे आदी उपस्थित होते. हा मसुदा स्वतः जरांगे यांनी वाचला तसंच त्यातील काही अस्पष्ट मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागितलं. त्याचबरोबर तासाभरात हैदराबाद गॅझेटियर तात्काळ लागू करण्याबाबतचा शासन निर्णय काढण्याचा आग्रह धरला. तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नसल्यावर ते ठाम होते. अखेर शासनानं तासाभरात जीआर काढला आणि तो हातात पडल्यानंतर मनोज जरांगे यांनी आपण आरक्षणाची लढाई जिंकलो अशी घोषणा केली. त्यानंतर विखेंच्या हस्ते जरांगेंना सरबत पाजून त्यांचं उपोषण समाप्त करण्यात आलं.

Manoj Jarange
Kishor Patil : 'हा तर वैशू ताईंचा बालिशपणा..' आता तीन्ही मेन लाईन भाजपात, शॉर्टसर्किट होणार ; आमदार भावाने काडी टाकली..

नेमक्या कुठल्या मागण्या मान्य?

राज्य मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेतलेले महत्त्वाचे निर्णय:

1️⃣ हैद्राबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय (GR)

2️⃣ सातारा गॅझेट महिनाभरात लागू करण्याचा निर्णय (स्वतंत्र GR)

3️⃣ 'मराठा व कुणबी एकच' या तांत्रिक बाबी जलदगतीने तपासून निर्णय

4️⃣ आंदोलकांवरील केसेस मागे घेण्याचा GR

5️⃣ आंदोलनात बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबियांना शासकीय नोकरी

6️⃣ मुंबईतील आंदोलकांच्या वाहनांवरील RTO दंड माफ

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com