Shivendraraje Bhosale: सातारा गॅझेटियरची जबाबदारी माझी! मी खोटा शब्द देणार नाही; शिवेंद्रराजेंचा जरांगेंना दिला शब्द

Shivendraraje Bhosale: उपोषणस्थळी प्रत्यक्ष जाऊन सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे यांनी जरांगेंच्या मागण्यांसंदर्भातील अहवालाचा मसुदा त्यांच्याकडं सुपूर्द केला. यावेळी या मसुद्याला जरांगेंनी मान्यता दिली.
Manoj Jarange_Vikhe, Shivendra raje, Manikrao Kokate
Manoj Jarange_Vikhe, Shivendra raje, Manikrao Kokate
Published on
Updated on

Shivendraraje Bhosale: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्या बहुतेक मागण्यात सरकारनं अखेर मान्य केल्या आहेत. पाच प्रमुख मागण्यांपैकी गॅझेटियरसंबंधीच्या तीन मागण्या लागू करणार असल्याचं पत्र सरकारच्यावतीनं उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे यांनी सुपूर्द केलं. सरकारच्या या पत्राला जरांगेंनी तासभराच्या चर्चेनंतर मान्यता दिली आणि सरकारचे आभार मानले. दरम्यान, चर्चेवेळी सातारा गॅझेटियरवर बोलताना शिवेंद्रराजे भोसले यांनी हे गॅझेटियर लागू करण्याची जबाबदारी आपली असल्याचा शब्द मनोज जरांगेंना दिला.

Manoj Jarange_Vikhe, Shivendra raje, Manikrao Kokate
Maratha Kunbi GR news : मराठा अन् कुणबी एकच, सगेसोयरे या दोन GR चे काय झाले? जरांगेंच्या प्रमुख मागण्यांबद्दल विखे पाटलांनी काय सांगितलं?

नेमका संवाद काय झाला?

जरांगे : "२५ लाख लोक १८८१ला सातारा संस्थानात दाखल होते. यात प्रत्येक व्यक्तीच्या घरातील दहा-दहा जरी धरले तरी २ कोटी मराठे पश्चिम महाराष्ट्रात होतात. तर एकट्या सातारा संस्थानात तर पूर्ण बसतात"

यातील एका स्पष्टीकरणाबाबत जरांगेंनी आक्षेप घेताच...

विखे : "हे मी मान्य करतो पण तसं केलं असतं तर आपला पूर्ण फोकस हा सातारा संस्थानवच राहिला असता,"

जरांगे : "आम्हाला वाटतं पश्चिम महाराष्ट्र आमचा, विदर्भ आमचा, खान्देश आमचा. पण मग आता सातारा गॅझेटियरची जबाबदारी तुमच्यावर (शिवेंद्रराजे)"

शिवेंद्रराजे : "झालीच"

जरांगे : तुमचा शब्द आम्ही अंतिम मानतो, राजेंचा शब्द एकदा आल्यानंतर बाकी कोणाला आम्ही मोजत नाही.

शिवेंद्रराजे : "खोटा शब्द देणार नाही. खोटं असतं तर आलो नसतो"

जरांगे : "तुम्हाला आम्ही कधी खोटं बोललो नाही आणि बोलणारही नाही. सातारा गॅझेटियरमध्ये २५ लाख लोकं १८८१ मध्ये दाखवते आहेत. या लोकांच्या घरातील पाच ते दहा माणसं पकडा फक्त, तर २ कोटी मराठे पश्चिम महाराष्ट्रात आहेत. ही जबाबदारी मग तुमची. आम्ही काही तुमच्याकडं वेळ मागितलेला नाही. फक्त इथं असं म्हटलं की, याच्या नोंदी तपासायसाठी साधारण पंधरा दिवस लागतील पण जास्तीत जास्त महिना धरुन चला. पण माझे हे पश्चिम महाराष्ट्रातील लोक वगळता कामा नये. या संस्थाननं आमच्या गोरगरिबाच्या लेकरांचं कल्याण केलं आहे. या नोंदी तपासण्यासाठी दुसरं कामच देऊ नका केवळ हेच काम त्यांना द्या"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com