Maratha Andolan: आंदोलन हाताबाहेर गेलंय, तसंच....; हायकोर्टानं गेल्या दोन दिवसांतील घटनाक्रमावर नोंदवलं निरीक्षण

Maratha Andolan : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरु असून आज त्यांच्या आंदोलनाचा चौथा दिवस आहे. यात गेल्या दोन दिवसांत जरांगेंच्या समर्थक आंदोलकांकडून हुल्लडबाजी केल्याचं दिसून आलं आहे.
Manoj Jarange Indefinite Hunger Strike
Manoj Jarange Indefinite Hunger StrikeSarkarnama
Published on
Updated on

Maratha Andolan : मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. पण गेल्या दोन दिवसांत जरांगेंच्या समर्थक आंदोलकांनी अनेक ठिकाणी हुल्लडबाजी करण्यात आल्याचं दिसून आलं आहे. यापार्श्वभूमीवर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. आंदोलनासाठी अनेक नियमांचं उल्लंघन केलं असल्याचा आरोप त्यांनी याचिकेतून केला आहे. या सुनावणीदरम्यान, कोर्टानं काही गंभीर निरिक्षण नोंदवली असून आंदोलकांना झापलं देखील आहे. आंदोलन हाताबाहेर गेलं असल्याची टिप्पणीही यावेळी हायकोर्टानं केली.

Manoj Jarange Indefinite Hunger Strike
कोकणात पन्हा राजकीय भूकंप? राज ठाकरेंनी नाकारलेला नेता हातात कमळ घेणार! समर्थकांचे स्टेटस व्हायरल अन् ‘मोर्चेबांधणी’ही सुरू!

हायकोर्टानं नेमकी काय निरिक्षण नोंदवली?

  1. मनोज जरांगेंच्या प्रकृतीची आम्हाला काळजी वाटते आहे, त्यांना आम्ही उपचार घेण्याचे आदेश देऊ शकतो.

  2. आंदोलकांनी आम्ही दिलेल्या अटी-शर्तींचं पालन करायला हवं.

  3. पाऊस असतानाही तुम्ही मुंबईत आला आहात. मुंबईतील शाळा, कॉलेज, नोकरदारांना त्रास व्हायला नको.

  4. काही वकिलांच्या आणि न्यायमूर्तींच्या गाड्याही आंदोलकांकडून अडवण्यात आल्या.

  5. सरकारनं आंदोलनाला परवानगीच कशी दिली.

  6. हे शांततेच सुरु असलेलं आंदोलन आहे का?

Manoj Jarange Indefinite Hunger Strike
Kirit Somaiya News सिल्लोडमध्ये माझ्यावर, गाडीवर हल्ला ; किरीट सोमय्या यांच्या दाव्याने खळबळ

आंदोलनासाठी स्टेडियम उपलब्ध करुन द्या - जरांगेंचे वकील

दरम्यान, यावेळी जरांगेंच्या वकिलांनी कोर्टात काही मागण्या केल्या. यामध्ये त्यांनी म्हटलं की, आमच्या आंदोलनासाठी दोन मैदान उपलब्ध करुन देण्यात यावीत. यासाठी ब्रेबॉन आणि वानखेडे स्टेडियम देऊ शकता का? यावर हायकोर्टानं जरांगेंच्या वकिलांना झापलं त्यांनी म्हटलं की तुम्ही काय मागणी करता तुम्हाला कळतंय का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com