Ganesh Naik : मनोज जरांगेंचे आंदोलन पेटले! गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंना सुनावले, 'बाटलीतील भुतं...'

Ganesh Naik targets Eknath Shinde : मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंना लक्ष्य करत बाटलीतली भुतं बाहेर काढल्याचा टोला लगावला. दरम्यान, जरांगे १५ सप्टेंबरला मुंबईकडे कूच करणार आहेत.
Eknath Shinde-Ganesh Naik
Eknath Shinde-Ganesh NaikSarkarnama
Published on
Updated on

Ganesh Naik targets Eknath Shinde : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची चर्चा सुरू आहे. जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत 15 सप्टेंबरला मुंबईकडे कूच करण्याची घोषणा केली आहे. जरांगे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर वनमंत्री गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंचे नाव न घेता टोला लगावला आहे.

‘बाटलीतली भुतं बाहेर काढली आहेत. ती आवरण्याची ताकद असेल तरच ती बाहेर काढायला हवी होती.’, असे नाईक म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, 'काही लोकांनी लावलेल्या आगी विझेना झाल्या आहेत, राज्यात दुष्काळाची स्थिती आहे. त्यामध्ये धर्माचे आणि जातीच्या नावाने राजकारण सुरू आहे. दु्ष्काळपरिस्थतीमुळे सर्व मंत्री टेन्शनमध्ये आहेत.'

यापूर्वीही गणेश नाईकांनी महापालिका निवडणुकीत शिंदेंवर टीका केली होती. त्यामुळे महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला होता. नाईकांच्या विरोधात शिवसेनेचे नेते देखील आक्रमक झाले होते. त्यानंतर ठाण्यातील क्लस्टर प्रकरणात देखील नाईकांनी शिंदेंना टार्गेट केले होते. आता पुन्हा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित करत नाईकांनी शिंदेंना डिवचले आहे.

Eknath Shinde-Ganesh Naik
TET: २००१ पूर्वी नियुक्त शिक्षकांनाही TETची सक्ती; पदोन्नतीचा मार्ग आता परीक्षेतूनच!

गेल्या १५ दिवसांपासून जरांगे हे उपोषण करत आहेत. सरकारने दोनवेळा शिष्टमंडळ त्यांच्याकडे पाठवले होते. मात्र, मागण्यांवर तोडगा न निघाल्याने जरांगे पाटील यांनी आपले आंदोलन अधिक आक्रमक करत मुंबईत उपोषण करण्याची रणनीती आखली आहे. ते 19 सप्टेंबरला मुंबईत आंदोलन सुरू करणार आहेत. पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली आहे. मात्र, जरांगे पाटील हे आंदोलनावर ठाम आहेत.

Eknath Shinde-Ganesh Naik
Manoj Jarange Protest : मुंबईला निघालेल्या मनोज जरांगेंना मोठा झटका, पोलिसांनी परवानगी नाकारली

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com