'भुजबळच्या कमरेत लाथ घालून त्याला मंत्रीमंडळाच्या बाहेर काढा, अशी टीका विरोधी आणि सरकारमधील लोक माझ्यावर करत आहेत. पण, 16 नोव्हेंबरला मंत्रीमंडळाचा राजीनामा देऊनच मी दुसऱ्या दिवशी 17 नोव्हेंबरला अंबडच्या ओबीसी मेळाव्याला गेलो होतो,' असं मोठं विधान मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी शनिवारी ( 3 फेब्रुवारी ) केलं होतं. यावरून मराठा नेते मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी सडकून टीका केली आहे.
"भुजबळांनी राजीनामा द्यावा किंवा समुद्रात जावं. आम्हाला त्याच्याशी देणं-घेणं नाही. फक्त मराठा आरक्षणाच्या विरोधात त्यांनी बोलू नये," असा इशारा जरांगेंनी भुजबळांना दिला आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
"भुजबळांना अजित पवार अन् फडणवीसांना डॅमेज करायचंय"
"छगन भुजबळ स्वत:च्या सरकारवर शंका घेत आहेत. त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॅमेज करायचं आहे," असा दावाही जरागेंनी केला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"ओबीसी समाजानं भुजबळांना बळ देऊ नये"
'नाभिक समाजानं मराठा समाजातील व्यक्तींची दाढी-कटिंग करू नये,' असं विधान छगन भुजबळांनी केलं होतं. याबद्दल प्रश्न विचारल्यावर जरांगे म्हणाले, "ते छगन भुजबळांचे विचार आहेत. गोरगरीब आणि ओबीसी बांधव उपाशी मेले पाहिजेत, असं भुजबळांचं स्वप्न आहे. बाराबलुतेदारांना भुजबळ ओबीसी आरक्षण खाऊन देत नाहीत. ओबीसी समाजानं भुजबळांना बळ देऊ नये"
"भुजबळांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नये"
"भुजबळांनी राजीनामा देऊन आमच्यावर उपकार केलेत का? राजीनामा देऊन डोक्यावर घेऊन फिरावं किंवा समुद्रात जावं, आम्हाला काय करायचं आहे. फक्त भुजबळांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नये," असा इशारा जरांगेंनी दिला आहे.
"सरकारला भुजबळांऐवढी मराठ्यांचीही गरज असावी"
"ज्या पक्षानं भुजबळांना मोठं केलं, त्यातही फूट पाडली आहे. उद्या सरकारमध्येही फूट पाडतील. सरकारला भुजबळांऐवढी मराठ्यांचीही गरज असावी," असं जरांगेंनी म्हटलं.
Edited By : Akshay Sabale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.