Manoj Jarange Patil : 'तुहं राहिलेलं वय गळून जाईन, पण तुला...'; मनोज जरांगे पुन्हा भुजबळांवर भडकले

Chhagan Bhujbal : मुंबईत जाऊन ज्यांच्या नोंदी सापडल्या, त्यांना व त्यांच्या सग्यासोयऱ्यांना आरक्षण देण्यासाठीचा अधिसूचना आणली.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Maratha Vs OBC Reservation : कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे, मराठा समाजाला व त्यांच्या सग्यासोयऱ्यांना ओबीसीतून आरक्षणाची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. त्यानंतर जरांगे पाटील आणि ओबीसी नेते व राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांच्यात जोरदार शाब्दिक चकमकी झडत आहेत. केंद्राचे अधिवेशन सुरू आहे, मनोज जरांगे त्यांच्याकडूनही आरक्षण मागू शकतात, असा टोला भुजबळांनी लगावला होता. त्यावर जरांगे पाटलांनी आपल्या स्टाईलने भुजबळांवर एकेरी भाषेत पुन्हा जोरदार हल्ला चढवला.

जरांगे पाटलांनी, 'तुहं राहिलेलं वय गळून जाईन, पण तुला माझं म्हणणं कळायंच नाही,' अशा शब्दात भुजबळांना (Chhagan Bhujbal) खडसावले. 'मराठ्यांचा पानीपत व्हावे, आमच्या पोरावर केसेस व्हाव्यात, आम्हाला मुंबईतच मांडी घालून बसण्याची वेळ यावी आणि मग यांनी पेटवापेटवी करावी, असा यांचा डाव होता. पण मराठ्यांच्या एकजुटीने तो हाणून पाडला. आता ते सोशल मीडियाच्या माध्यमातून बडबड करत आहे,' असा घणाघातही केला.

Manoj Jarange Patil
Ganpat Gaikwad Firing : श्रीकांत शिंदेंचा रुग्णालयाच्या बाहेरुन मोठा इशारा; म्हणाले, 'सीसीटीव्ही फुटेज...'

'तू माझ्या नादीच लागू नको, मी दिसतो असा, पण तुला, माझ्या बोलण्याचा अर्थच कळणार नाही. राज्य सरकारच अधिवेशन झालं तेव्हा तुम्ही का दिलं नाही आरक्षण? मग केंद्राकडून मिळणार असले, तर आम्ही मागणी केली तर तुला पोटजळी का होती ? मुंबईत जाऊन आम्ही ज्यांच्या नोंदी सापडल्या, त्यांना व त्यांच्या सग्यासोयऱ्यांना आरक्षण देण्यासाठीचा अधिसूचना आणली. तू फक्त 16 तारखेला पहाय काय होतं ते?' असे आव्हानच मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी भुजबळांना दिले.

Manoj Jarange Patil
Banner Politics: ‘आम्हाला मत मागायला येऊ नका..!’ अकोल्यात आगळीवेगळी बॅनरबाजी

'मराठ्यांचे यश त्यांना आणि आमच्यातल्याही काही जणांना खूपतंय. यांच्या हाकेवर आता मराठा एक होत नाही, आमच्या हाकेवर होतात, याची पोटदुखी त्याला होत आहे. 16 तारखेपर्यंत किंवा येणाऱ्या अधिवेशनापर्यंत वाट पहा, मग तुम्हा कळेल आम्हाला काय मिळाले ते?' असेही मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांना उद्देशून म्हटले. 'तू ओबीसींचे (OBC) वाटोळे केले, पण आम्ही ते होऊ देणार नाही,' असाही आरोप जरांगेंनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'तू गप्प राहा नाहीतर टपकन वर जाशील. माझ्या नादी लागू नको आणि गोरगरीब ओबीसींचं वाटोळं करु नको,' अशी टीकाही जरांगे पाटील यांनी केली. 'मला उपोषण करू नको म्हणतो, मग तू नको करू आंदोलन, गप्प पड एका जागी. तुझे वय झाले आहे म्हणून आम्ही तुझा आदर करू. पण गप्प बसला नाही, तर तुला मी काही सोडत नाही,' असा सज्जड दमही जरांगे पाटलांनी भुजबळांना दिला.

(Edited by Sunil Dhumal)

Manoj Jarange Patil
Madha Loksabha : माढा लोकसभा मतदारसंघाबाबत अजित पवारांचे भाष्य; ‘तुम्ही कशाला नको ते....’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com