Ram Shinde: अलर्ट राहा! अजून बरेच बाॅम्ब फुटणार? जगतापांच्या भेटीवर राम शिंदेंची सूचक प्रतिक्रिया

Maharashtra Politics: 'आम्ही समाजमाध्यमांवर व्हायरल करत नाही, तर आपोआप व्हायरल होतो',
Ram Shinde, Arun Jagtap
Ram Shinde, Arun JagtapSarkarnama
Published on
Updated on

Nagar: राजकीय दिवाळी फराळाच्या कार्यक्रमांना आता उरक आला असला, तरी त्याचे कवित्व संपलेले नाही. भाजपचे नेते आमदार राम शिंदे यांनी त्यांच्या दिवाळी फराळाच्या कार्यक्रमांनंतर आता त्यांनी नगर दक्षिणेवर स्वार झाले आहेत. गाठीभेटींवर जोर वाढवला आहे. त्यामुळे राम शिंदे यांच्या मनात आहे, तरी काय याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगली आहे. राम शिंदे हे दिवाळी बाॅम्बवर बाॅम्ब फोडत आहेत.

भाजपचे नेते आमदार प्रा. राम शिंदे यांची नगर दक्षिणेमधून लोकसभा 2024 निवडणूक लढवण्याची इच्छा जाहीर केली आहे. तशी त्यांनी पक्षश्रेष्ठींकडेदेखील मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी नगर दक्षिणेत गाठीभेटींचा वेग वाढवला आहे.

राम शिंदे यांनी काल राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अरुण जगताप यांची त्यांच्या आयुर्वेदिक रुग्णालयातील कार्यालयात भेट घेतली. ही भेट नियोजित होती. या दोघा नेत्यांनी एकमेकांचे स्वागत केल्यानंतर यांच्यात बरीच खलबते रंगल्याची चर्चा आहे. यावर दोघांकडून भाष्य करण्याचे टाळले जात आहे. राम शिंदे यांनी या भेटीवर 'आम्ही समाज माध्यमांवर व्हायरल करत नाही, तर आपोआप व्हायरल होतो', अशी प्रतिक्रिया 'सरकारनामा'शी बोलताना दिली.

Ram Shinde, Arun Jagtap
Manoj Jarange: आरक्षणाचं काय झालं? समितीतील नेत्यांना जरांगे जाब विचारणार

'अजून बरेच काही बॉम्ब फोडायचे आहेत, अलर्ट राहा. पुढील काही दिवसांत नगर दक्षिणेमध्ये गाठीभेटींचा वेग आणखी वाढणार आहे', अशीही सूचक प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

आमदार शिंदे यांनी या भेटीत ज्येष्ठ नेते अरुण जगताप यांच्याशी काय चर्चा झाली हा तपशील सांगितला नसला, तरी या भेटीविषयी नगरच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. राम शिंदे यांनी ही भेट घेतल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांचीदेखील भेट घेतली. शिवसेनेचे नगर दक्षिणप्रमुख शशिकांत शिंदे आणि युवा सेनेचे नेते विक्रम राठोड यांचीदेखील भेट घेतली. या शिवसेना नेत्यांची राम शिंदे यांनी काही राजकीय गोष्टींवर भाष्य केल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना ठाकरे गटाची भूमिका काय असेल, यावर चर्चा झाल्याचे समजते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अरुण जगताप यांची 2019 मधील कमाल!

आमदार राम शिंदे यांची अरुण जगताप यांच्या भेटीत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. जगताप यांच्यावर मध्यंतरी मोठी शस्त्रक्रिया झाली. यासाठी ही भेट आवर्जून होती. ज्येष्ठांचे नेहमीच मार्गदर्शन असते, असे या भेटीमागील कारण राम शिंदे यांनी सांगितले. परंतु राजकीय विश्लेषकांनी या भेटीमागे गेल्या 2019 च्या लोकसभेचा अंदाज बांधला आहे.

शिंदे-जगताप भेटीची चर्चा

भाजपकडून डॉ. सुजय विखे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून संग्राम जगताप यांच्यात लोकसभा 2019ची लढत झाली होती. राष्ट्रवादीकडून लढताना संग्राम जगताप यांना निवडणुकीसाठी कमी वेळ मिळाला होता. तरीदेखील मतदान खेचण्यात राष्ट्रवादीला यश मिळाले होते. या मागे ज्येष्ठ नेते अरुण जगताप यांची कमाल होती. जुन्या संपर्काच्या अनुभवातून ही कमाल ज्येष्ठ नेते अरुण जगताप यांनी घडवून आणली. नगर दक्षिणमध्ये संपर्क केला होता. यात ते कमालीचे यशस्वी ठरले होते. त्यामुळे राम शिंदे यांची अरुण जगताप यांच्याशी ही भेट चर्चेत आली आहे.

Edited By : Mangesh Mahale

Ram Shinde, Arun Jagtap
Manoj Jarange : म्हातारा माणूस आहे, म्हणून मी काही बोलत नाही, पण..; जरांगेंचा भुजबळांना इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com